
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील मोहरद या गावात जिल्हा परिषद मराठी शाळा लगत साहेबराव नथू पाटील यांच्या मालकीच्या शेतातून टूबेलच्या विद्युत वाहिनीतून तार कंपाउंड ला लागून जवळच असलेल्या पेटीतून करंट उतरून आसिफ आमद तडवी वय १७ वर्ष हा मुलगा बकऱ्यासाठी चारा घेण्यास गेल्याने त्याने अचानकपणे शाळेच्या तार कंपाऊंडला हात लावला आणि त्याला करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला त्याचे आई-वडील भाऊ सकाळपासून त्याच्या शोध घेत होते कारण की तो सकाळी सहा वाजेपासून चारा घेण्यास गेला होता आणि एका लग्नाच्या ऑर्डर साठी वेटर म्हणून वाढायला जाणार होता तरी काही मित्र आसिफ चा शोध घेत होते की कुठे गेला तरी सर्व गावाच्या आजूबाजूच्या शेतात शोध घेत होते आणि तो जवळच मराठी शाळेच्या कंपाउंड ला चिपकून उलटा पडलेला होता त्याच्या सर्व अंग काळा पडलेला असून त्याच्या जागीच मृत्यू झाला होता त्याला करंट चा भास न आल्याने त्याने तार कंपाउंडला हात लावला आणि जागीच मृत्यू झाला हे लक्षात येताच अजून एका लहान मुलाला करंट लागला तेव्हा माहित पडले की या शाळेच्या तार कंपाऊंडला करंट उतरलेला आहे संध्याकाळी ५ वाजता त्याला ग्रामस्थांच्या मदतीने ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून पोस्टमार्टम साठी चोपडा सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्ट मार्टम करण्यात आले पुढील तपास अडावद येथील पोलीस कर्मचारी करीत आहेत







