Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे १५० वी सरदार पटेल जयंती उत्साहात साजरी …

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 1, 2025
in सामाजिक
0

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या खान्देश विभागातर्फे ३१ ऑक्टोंबर रोजी लेवा पाटीदार समाजाचे आराध्य दैवत आणि अस्मिता सरदार पटेल यांची 150 वी जयंती माजी नगराध्यक्ष श्री पांडुरंग काळे ( बंडू दादा) यांच्या निवासस्थानी जळगांव या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली…

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल, समाजाची अस्मिता कवयित्री बहिणाबाई, तारणहार विठू माऊली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, महासंघाचे विभागीय संयोजक तथा भोरगाव लेवा पंचायत जळगाव विभाग सदस्य प्रकाश वराडे, पत्रकार अमोल कोल्हे, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष लिलाधर चौधरी, मनकर्णिका महिला मंडळ अध्यक्षा सौ. नीता वराडे, लेवा सम्राज्ञी फाउंडेशन च्या अध्यक्ष डॉ सौ ज्योती महाजन, ॲड डॉ सौ ज्योती भोळे, लेवा सखीच्या सौ नीलिमा राणे आणि प्राचार्या श्रीमती साधना लोखंडे, मुख्याधापक सौ पुष्पा पाटील यांनी उपस्थितांतर्फे आणि समाजातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन केले. सर्व उपस्थितांनी सुद्धा प्रतिमा पूजन केले.

यावेळी भारताच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या स्मृती दिना निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली…

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले. सरदार पटेल यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला.
त्याचसोबत डॉ विजय महाजन यांच्या इंदाला ग्रुप, कल्याण या ठिकाणी मुंबई परिसर लेवा मंडळे आणि महाराष्ट्र यातील कार्यकर्त्यांच्या महासभेचा वृतांत सादर केला.

सामाजिक कार्यात महासंघाचा प्रत्येक क्षेत्रात खारीचा वाटा सुरू आहे, समाज एकसंघ होण्यासाठी “एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ” या महासंघाच्या ब्रीद वाक्यावर वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन केले.

डॉ मिलिंद पाटील यांनी त्यांची सरदार पटेल आणि लेवा समाजावर भाष्य करणारी स्वरचित कविता त्यांनी स्वतः आणि सौ निता वराडे, ॲड डॉ सौ ज्योती भोळे, सौ नीलिमा राणे, श्रीमती साधना लोखंडे यांच्या आवाजात सादर केली आणि कार्यक्रमाला रंगत आणली…

ॲड ज्योती भोळे यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या ठिकाणी सरदार पटेल यांच्याविषयी लिहिलेल्या माहितीचा उल्लेख करून त्यांची महानता अधोरेखित केली.

या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष, छावा चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, पत्रकार
श्री अमोल कोल्हे यांची नुकतीच “मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेच्या” जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यानंतर अमोल कोल्हे यांनी आपल्या कार्याविषयी माहिती दिली तसेच महासंघासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

त्यानंतर महासंघातर्फे नियुक्त केलेल्या जळगाव विभाग महिला ज्येष्ठ सल्लागार पदी डॉ सौ ज्योती महाजन, महिला व कायदेविषयक सल्लागार पदी ॲड डॉ सौ ज्योती भोळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ नीता वराडे, जळगाव विभाग महिला संयोजक पदी श्रीमती साधना लोखंडे, संयोजक पदी सौ नीलिमा राणे, संयोजक पदी सौ नीला चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

बंडू दादा काळे यांनी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी चांगल्या कार्यकर्त्यांनी, समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नमूद केले. समाजासाठी मंडळांनी योग्य प्रकाराचे आणि योग्य दिशेने काम न केल्यास त्याचा काय फायदा असा प्रश्न उपस्थित केला.

प्रकाश वराडे यांनी लेवा पाटीदार समाज आजवर उन्नती करत आलेलाच आहे असे नमूद केले. त्यांनी सांगितले दुधात साखर म्हणजे आपल्या समाजातील कन्या कु भूमिका संजय नेहेते, नाशिक (मूळ गाव कोथळी) हिने
बहरीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेत 200 मीटर धावण्यात जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत तीने ब्रॉन्झ मेडल जिंकले आणि दुसरी लेवा पाटीदार समाज कन्या कु भूमिका भूषण नेमाडे, डोंबिवली (मूळ गाव जळगांव) हिने थायलंड या ठिकाणी झालेल्या रोप जम्प मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या दोन्ही कन्यांचे महासंघातर्फे शाब्दिक अभिनंदन करण्यात येऊन तसा ठराव पास करण्यात आला.

सौ नीता वराडे यांनी महासंघात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने आपले विचार प्रकट केले त्याचप्रमाणे लवकरच महासंघाचे सर्व विभागांचे एकत्रितपणे महिला संमेलन घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी खान्देश विभागाचे विभागीय उपाध्यक्ष चंद्रकांत बेंडाळे, नियुक्त सदस्य व लेवा चेंबर जळगाव चॅप्टर अध्यक्ष नितीन इंगळे, खानदेश विभाग उपाध्यक्ष महेंद्र पाटील, नियुक्त सदस्य किशोर भंगाळे, सुनील काळे, उमाकांत बोंडे, यादवराव बऱ्हाटे, भास्कर बोरोले, गजानन किनगे सर , घन:श्याम चौधरी सर ,प्रदीप पाटील, किशोर खडसे, मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बंडू दादा यांनी हाय टी चे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे सुरेख बहारदार सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ मिलिंद पाटील यांनी केले.

त्यानंतर श्रीमती साधना लोखंडे यांनी गायिलेल्या राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
(शब्दांकन.. डॉ मिलिंद पाटील)

Previous Post

तोतया पत्रकारांचा झालाय बुजबुजाट; आर्थिक लाभासाठी करताहेत थयथयाट शासन-प्रशासनावर जमवतात रुबाबाचा मेळ; खरे पत्रकार पाहताहेत उघड्या डोळ्यांनी हा खेळ!

Next Post

मोहरद येथे मराठी शाळेच्या लागून शेतातील ट्यूबवेलच्या पेटीतून वॉल कंपाऊंडला करंट उतरून एका १७ वर्षाचा मुलाचे मृत्यू

Next Post

मोहरद येथे मराठी शाळेच्या लागून शेतातील ट्यूबवेलच्या पेटीतून वॉल कंपाऊंडला करंट उतरून एका १७ वर्षाचा मुलाचे मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..