
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त १ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक व विकासात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळची सुरुवात आशिर्वाद ड्रिमसिटी येथील विठ्ठल मंदिरात आरतीने होणार असून त्यानंतर अंजुळी येथील विठ्ठल मंदिरात पूजा व दर्शन घेण्यात येणार आहे. त्यानंतर शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकार व संवाद साधला जाईल

दुपारच्या सत्रात मराठा समाज मंगल कार्यालय सातारळ रोड पाचोरा येथे शैक्षणिक ऑफिसचे उद्घाटन तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापारी बांधवांचा सत्कार व विकास कामांचे भूमिपूजन पार पडणार आहे संध्याकाळी पाचोरा शहरातील विकासाच्या विविध योजना उद्घाटनांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. निलम गार्डन चौक, रेस्ट हाऊस चौक व शिवनेरी चौक येथे सुसज्जीकरण उद्घाटन सोहळे पार पडणार असून,सायं. ६ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निर्धार मेळावा सभा होणार आहे या सर्व कार्यक्रमांना पाचोरा-भडगाव परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना युवासेना पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघा तर्फे करण्यात आले आहे आप्पांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे संकल्प, विकासाचे निर्धार आणि लोकसेवेची नवी ऊर्जा साकार होणार शनिवार दि०१/११/२०२५ रोजी सायं. ५:०० वाजता. कार्यक्रम स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथील होणार आहे







