
(प्रतिनिधी:अमोल खरात)
जामनेर: शहरातील संतोषी माता मंदीर गिरीजा कॉलोनी,येथील गणनाम वारकरी परिवारातर्फे नेहमी प्रमाणे या ही वेळेस श्री क्षेत्र शेगांव, माऊली श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या पायी वारी मध्ये एक भटकत असलेला श्वान सहभागी झाला.
‘भेटी लागी जिवा, लागलीसे आस’, तुकोबारायांच्या या अभंगातील ओळीप्रमाणे सध्या हजारो वारकऱ्यांच्या पायी दिंड्या ठिकठिकाणाहून शेगांव च्या दिशेने चालत असतात. सर्व वारकऱ्यांना श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची आस लागलेली असते. तसंच जामनेर शहरातील गिरीजा कॉलोनी येथील संतोषी माता मंदीर येथून शेगांव श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या गणनाम वारकरी परिवार पायी दिंडीतून असाच एक मुका जीव वारकऱ्यांच्या बरोबर शेगांवची वारी करत आहे. तो जीव आहे एक भटका श्वान. वारकऱ्यांसमवेत मलकापुर येथून हा श्वान दिंडीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे हा श्वान भटकंती करत असतांना याला हा विचार आला कसा असा प्रश्न वारकऱ्यात निर्माण झाला.
मुक्कामात ही तो हजर राहिला आणि पुढच्या वाटचालीसाठी ही तो वारकऱ्यांन सोबत शेगांव कडे रवाना झाला. श्वानाच्या या अनोख्या वारीने वारकरीही भारावून गेले.
थोड्या अंतरानंतर तो परत फिरेल, असे वारकऱ्यांना वाटले मात्र तो चालतच राहिला. प्रत्येक जीवामध्ये देवाचे अस्तित्व असते. अशा भावनेने या वारकऱ्यांनी या श्वानाला दिंडीबरोबर चालू दिले.सलग तो मलकापूर ते शेगांव चालत राहिला हा श्वान वारकऱ्यांबरोबर दिंडीतून शेगांव येथे पोहोचला आहे.
वारकऱ्यांनी त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला व त्या माऊली असे नाव दिले असून तो दिंडीत अत्यंत शिस्तीने चालत आहे व सर्वांचे लक्ष वेधत आहे.
वारकऱ्यांचा जिव्हाळा शेगांवच्या वारीत सोबत करणारा हा मुका जीव सुरक्षित रहावा, यासाठी वारकऱ्यांनीही त्याची काळजी घेतली. गणनाम वारकरी परिवारात त्यालाही सहभागी केले असे जयेश भाऊ गोसावी व अजय भाऊ जाधव यांनी वारकऱ्यांशी बोलतांना सांगितले.
प्रत्येक दिवशी त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली जाईल व त्याला पुढील वर्षी आषाठी एकादशी निमित्त जाणाऱ्या दिंडी सोहळ्या समवेत पंढरपूरच्आ वारी मध्ये सोबत नेले जाईल.
मुक्कामात त्याचे इतर श्वानांपासून संरक्षण केले जात आहे. जणू वारकऱ्यांना त्याचा लळा लागला आहे.







