
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
धरणगाव येथे एका अल्पवयीन अल्पसंख्यक मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार, लैंगिक छळ, आणि हत्या करण्याच्या प्रयत्नासंबंधी धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ३४५/२०२५ मध्ये फक्त बी एन एस ७४, ७५ (१), ११५ (२) पॉक्सो ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणात आरोपी ने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्यंत क्रूर व अमानुष अत्याचार केल्याचे तसेच तिच्या जीवावर बेतणारा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पीडित मुलीला न्याय मिळावा
म्हणून एकता संघटनेने धरणगाव पो. स्टे.येथे जाऊन पोलिस निरीक्षक सुनील पाटील व तपासी अधिकारी पी.एस.आय. बडगुजर यांची भेट घेऊन चर्चा करून फिर्यादीचे पुरवणी जबाब व संघटनेची तक्रार असे दोन लेखी तक्रार अर्ज सादर केले.
तक्रार अर्जात गंभीर बाबी सादर
तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की, घटने दरम्यान आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिला धमकावून जबरदस्ती केली व नंतर तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून तो हत्या प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार या गंभीर गुन्ह्यांत मोडतो.
त्यामुळे संबंधित एफ आय आर मध्ये बी एन एस ची हत्या करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक मारहाण करणे,धोकादायक साधनांनी गंभीर दुखापत करणे,
अल्पवयीन मुलीचे अपहरण / जबरदस्ती नेणे, स्पर्श करून त्रास देणे व गुन्हेगारी धमकी देणे. त्याच सोबत पोक्सो कायदा लैंगिक अत्याचार , लैंगिक छेडछाड व त्रास देणे, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, एफ आय आर नोंदविण्याची जबाबदारी निश्चित करणे. आदी कलमे वाढवण्यात यावी अशी मागणी केली.
आरोपीस बालक नव्हे तर प्रोढ म्हणून संबोधावे: फारुक शेख
तक्रार अर्जात आरोपी हा १७ वर्षे ११ महिने वयाचा असून अल्पवयीन म्हणून त्याच्यावर जुनियल जस्टिस बोर्ड मार्फत प्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आणि हेनियस (जधन्य) गुन्हा असल्यामुळे, ज्यूव्हेनाईल न्याय कायदा कलम १५ व १८(३) नुसार संबंधित आरोपीवर मेजर (प्रौढ) म्हणून कारवाई करावी. पुढे त्यांनी पोलिस व पत्रकार यांना संबोधित करतांना सांगितले की “लहान मुलि सोबत झालेला हा अत्याचार समाजाच्या अंतःकरणाला हादरवणारा आहे. आरोपीने केलेला अपराध हा ‘हेनियस क्राईम’ असून त्याच्यावर प्रौढ (मेजर)म्हणून सेशन कोर्ट ची कारवाई करावी व न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही.” असे मत फारुक शेख यांनी व्यक्त केले.
या निवेदनावर जळगाव जिल्हा एकता संघटन चे मुफ्ती खालीद, फारुख शेख, अँड आवेश, अनिश शहा, हाफिज रहीम पटेल, आरिफ देशमुख, हाजी युसुफ, हाफिज जुनेद , सईद फयाज , तसेच धरणगाव चे हाजी रफिक कुरेशी ,बशीर मोमीन ,नदीम काझी, रहमान शाह तसेच समाजातील विविध मान्यवरांनी स्वाक्षऱ्या करून हा तक्रार अर्जाच्या प्रत पोलिस अधीक्षक, बाल संरक्षण अधिकारी व जिल्हा ज्यूव्हेनाईल बोर्ड जळगाव यांना सुद्धा पाठविले आहे.
१) पोलिस निरीक्षक सुनील पाटील व पोलिस उप निरीक्षक बडगुर यांना तक्रार अर्ज देताना मुफ्ती खालिद , फारुक शेख, अनिस शाह, हाफिज रहीम पटेल आदी दिसत आहे.







