
जळगाव : प्रतिनिधी अमोल खरात
तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा लुटीची थरारक घटना घडली आहे. डोळ्यात मिरची पावडर फेकून लुटण्याचा प्रयत्न करताना एका युवकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या निष्क्रियतेचा व नाकर्तेपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
सय्यद जावेद सय्यद अली व याकूब खान दाऊद खान असे लूट प्रयत्नात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.
आश्चर्य म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी ‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांच्या घरात चोरीची घटना घडली होती. व त्याच परीसरात त्याच रात्री एक अजून घर लुटण्यात आले होते चोरीकरणारे चोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून देखिल त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे त्या प्रकरणातही तालुका पोलिसांना अद्याप यश मिळालेले नाही. या सलग घटनांनी नागरिकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे तालुका पोलिस झोपेत आहेत का? की झोपेचे सोंग घेत आहेत
स्थानिकांकडून माहिती मिळाली आहे की, ‘साई गार्डन’ नावाचे हॉटेल हे मध्यरात्री एक ते दोन वाजेपर्यंत बियर बार सारखे निर्धास्तपणे सुरू असते, तर त्याच्याच शेजारी गावठी दारूचे दुकान खुलेआम सुरु आहे. हॉटेल साई गार्डन चा परिसर जणू दारोड्यांचा अड्डा बनला आहे
हे सर्व तालुका पोलिसांच्या हद्दीत घडत असूनही कुणाचेही कानावर पडत नाही, का पाहून देखून काना डोळा केला जातोय हे अधिकच संशयास्पद आहे.
पोलिसांचा खाकी वर्दीचा धाक आता गुन्हेगारांवर उरलेला नाही असेच या घटनांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे व तालुका पोलीस ठाण्यातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी व्यक्त केली जात आहे.






