
शेतकऱ्यांना कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
ता.प्रतिनिधी : राहुल जयकर
भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे स्मार्ट मीटर विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. “स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करा”, “स्मार्ट मीटरवर कायमस्वरूपी बंदी घाला”, “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या”, “ओला दुष्काळ जाहीर करा” अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.
निवेदन तहसीलदार कार्यालय, उपअभियंता कार्यालय व बोदवड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुरेश इंगळे, उपाध्यक्ष लखन सुरवाडे, तालुका उपाध्यक्ष नरेश इंगळे, सिद्धू सुरवाडे, आकाश भाऊ, तालुका प्रसिद्धी प्रमुख रविराज शिरसाठ, ग्रामीण प्रसिद्धी प्रमुख रोहित लोहार आदी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबर रोजी बुधवार सकाळी ११ वाजता स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा काढण्यात येणार असून, कृषी उत्पन्न बाजार समितीपासून उपअभियंता कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.






