
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा गावानजीक असलेल्या पी. जे. रेल्वे लाईन जवळ लक्झरी व कारची समोरासमोर धडक होवुन अपघात झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी चारचाकी कार मधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे जळगावहुन पुण्याला जाणारी लक्झरी बस (क्रं. एम. पी. १३ पी. ६१७१) व पाचोऱ्याहुन नेरी ला जाणारी चारचाकी कार (क्रं. एम. एच. ४१ बी. ई. २२९४) यांची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा गावानजीक असलेल्या पी. जे. रेल्वे लाईन जवळ झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील होणारा अनर्थ निश्चित टळला आहे. पी. जे. रेल्वे लाईन जवळ रस्त्याच्या मधोमध मोठं मोठे खड्डे पडलेले असल्याने चारचाकी कार मोठ्या खड्ड्यात आदळल्याने त्याच वेळी समोरुन येणाऱ्या लक्झरी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कार चा पुढील भाग चक्काचूर झाला तसेच लक्झरी बसचे ड्रायव्हर साईडचे टायर फुटले व त्या बाजुचे नुकसान झाले असुन कार मधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. लक्झरी बस मधुन २० प्रवाशी प्रवास करीत होते.







