
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले गावातील युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता नवनीत बागले शिंदखेडा तालुक्यातील लहान गावात जन्मलेल्या गरीब कष्टकरी हात मजुराच्या मुलगा परंतु सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला तरुण कुठला राजकीय वारसा नसलेले युवा नेतृत्व नवनीत बागले अशी त्यांची ओळख 2010 यावर्षी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामाजिक कार्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली. पुरोगामी विचारसरणीचे असलेले नवनीत बागले यांनी भरिप बहुजन महासंघ शिंदखेडा तालुका ग्रामीण अध्यक्ष पदावरती असतांना आंदोलनं ,मोर्चे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला धारेवर धरले तसेच बेरोजगार , भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष पासून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावरती राहून प्रशासन दरबारी वेळोवेळी कष्टकरी वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.भिम आर्मी धुळे जिल्हा महासचिव पदावर असतांना आदिवासी ,शेतकरी व दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरोधी संवैधानिक पद्धतीने न्याय मिळवून दिला. गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती , डॉ .बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज , माता रमाई जयंतीनिमित्त गरजू मुलांना वही,पेन, शैक्षणिक साहित्य वाटप करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले.बाम्हणे ,रहिमपुरे ,कुरूकवाडे,जोगशेलू, विखरण या गावांशी नेहमी ते नागरिकांच्या सुख-दुखात सहभागी होतात.युवा नेतृत्व नवनीत बागले सोशल मीडियाच्या माध्यमातून जागतिक दिनविशेष व प्रत्येक महापुरुषांच्या जयंती , पुण्यतिथींचे संदेश प्रसारित करीत असतात.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत विखरण गण येथून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी ते उत्सुक आहेत.







