
स्नेहा उत्तम मडावी पुणे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन जन्मभूमीवर साहित्य, संतवाङ्मय आणि संस्कृतीचा सोहळा रंगणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थानच्या वतीने आयोजित द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी आपेगाव येथे भव्य उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिका डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांच्या हस्ते होणार असून, या संमेलनाचे अध्यक्षस्थान हास्यकवी संजय कावरे भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून संतपरंपरेचे तेजस्वी प्रतिनिधी आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर हे असणार आहेत. या संमेलनाचे आयोजन लोककवी विजय पोहनेरकर, कवयित्री अलका बोर्डे, चित्रकार अरविंद शेलार, उद्योजक शांताराम गायकवाड आणि लेखक संदीप राक्षे यांनी केले आहे. आपेगावातील संतभूमीवर या मंडळींनी साहित्य आणि भक्तीचा सुंदर संगम घडवण्याचा संकल्प केला आहे. संपूर्ण दिवसभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. सकाळी ज्ञानदीप प्रज्वलन करून संमेलनाची मंगल सुरुवात होईल. या नंतर ज्ञानरत्न पुरस्कार वितरण सोहळा! होणार आहे, ‘हासू आणि आसू’ हास्य कवितांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमा नंतर होणाऱ्या कवी संमेलनात महाराष्ट्रभरातील युवा आणि ख्यातनाम कवी/ कवयित्री सहभागी होणार आहेत. दुपारी होणाऱ्या ‘साहित्यिक संवाद आणि मुलाखत’ या सत्रात आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सायंकाळी भजनसम्राट सदानंद मगर यांच्या भजन संध्येद्वारे संमेलनाला भक्तिभावाचा रंग लाभेल. शेवटी दीपोत्सवाने (संतज्ञानदीप प्रज्वलन समारंभ) संतभूमी उजळणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान श्रीक्षेत्र आपेगाव यांच्या वतीने खालील साहित्यिकांना ‘ज्ञानरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ज्ञानरत्न पुरस्कार:- लेखक, ह.भ.प हरिभाऊ शिंदे, यवतमाळ. कवयित्री वंदना जायले, अकोला. कवी गणेश सांगुनवेढे, संग्रामपूर. हास्यकवी नितीन वरणकार, शेगाव. लेखक संजय गोराडे, नाशिक. कवी ज्ञानेश्वर शिळवणे, चाकण. कवयित्री अलका सपकाळ, भूम. कवयित्री शालिनी सहारे, पुणे. कवयित्री शैलजा करोडे, मुंबई. कवी जे. डी. भुसारे, मुंबई. कवी डाॅ. प्रभाकर शेळके, जालना. लेखक दिगंबर ढोकले, भोसरी. कवी देवेंद्र इंगळकर, पनवेल. कवी धोंडिराम राजपूत, वैजापूर. कवी निवृत्ती कानवडे, संगमनेर. कवी पेंटर देशमुख, शेगाव. कवी मधुकर गिलबिले, चाकण. कवी लक्ष्मण हेंबाडे, मंगळवेढा. कवी सुदर्शन टोपरे, अंजनगाव सुर्जी. कवी हरिदास कोष्टी. लेखक डाॅ. सतिश पाटील, नाशिक. कवयित्री पूजा बागुल, नाशिक. सूत्रसंचालक रविंद्र मगर, संभाजी नगर. गझलकार राम गायकवाड. कवी संतोष साळुंके, आळंदी. कवी अमोल चरडे, पुणे, कवी बबनराव धुमाळ, वाघोली. कवी प्रमोद काकडे, अमरावती. माऊली मुळे, आपेगाव. कवी विलास पुंडले, पनवेल. कवी सुदर्शन धस, अहिल्यानगर. कवी संतोष गाढवे, खेड. कवी राजेंद्र उगले, नाशिक. कवी प्रवीण बोपुलकर, पनवेल. कवी डाॅ. राम शिंदे, मुंबई. कवी रवींद्र काळे, मुंबई, कवी विलास पंचभाई, नाशिक. कवी प्रशांत केंदळे, नाशिक. सूत्रसंचालक रविंद्र मालुंजकर, नाशिक. गीतकार सोमनाथ पगार, नाशिक. कवयित्री निशा कापडे, संभाजी नगर, कवी किरण भावसार, नाशिक. कवयित्री प्रतिभा खैरनार, नांदगाव. कवयित्री डाॅ. अंजना भंडारी. कवयित्री छाया जायभाये, जालना. कवयित्री अलकनंदा आंधळे, संभाजी नगर. कवयित्री जयश्री गीते, शेगाव. कवयित्री अलका अमृतकर, नाशिक. कवयित्री सुजाता येवले, नाशिक. कवी सागर जाधव जोपूळकर, चांदवड. कवयित्री स्नेहल येवला, ठाणे. कवी विशाल कुलट, अकोला. कवयित्री संध्याराणी कोल्हे, धाराशीव. कवी विशाल टर्ले, नाशिक. गायिका वैष्णवी सदानंद मगर, संभाजी नगर. कवयित्री शालिनी बेलसरे, अमरावती. कवी हरिदास आखरे, शेगाव. विनायक भारंबे, शेगाव.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र मातीत होणारे हे संमेलन केवळ साहित्यिकांची मेजवानी नसून, ज्ञान, भक्ती आणि संस्कृतीचा एकत्र उत्सव होणार आहे. संमेलनाच्या आयोजन समितीने सांगितले की, संतसाहित्य आजही समाजाला दिशा देते. आपेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांचे पवित्र जन्मस्थान असून, या भूमीत साहित्याचा मेळा भरविणे म्हणजे संतपरंपरेला वंदन करण्यासारखे आहे. हे संमेलन हे केवळ शब्दांचे नव्हे, तर विचार आणि संस्कारांचा महायज्ञ ठरणार आहे…







