
सामाजिक कार्यातील सक्रिय भूमिका आणि जनसंपर्काच्या बळावर दावेदारी मजबूत
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोदा बु गणात सौ. ममताताई निलेश आमोदकर या प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहेत. मस्कावद गावच्या रहिवासी असलेल्या ममताताई गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय कार्यात सक्रिय असून त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सहभाग नोंदवला आहे.
ममताताई आमोदकर या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून अग्रस्थानी आहेत. स्थानिक स्तरावरून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांत त्यांनी गरजू कुटुंबांना रेशन कार्ड मिळवून देणे, निराधार महिलांना निवृत्ती वेतन मिळवून देणे, तसेच महिला प्रश्न मांडणे व सोडविणे यांसारख्या अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे.
सामाजिक कार्यात त्यांनी आपल्या पती निलेश आमोदकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले असून, निलेश आमोदकर हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
स्थानिक नागरिकांच्या मते, “जनतेच्या अडचणी जाणणाऱ्या, सातत्याने लोकांसाठी उपलब्ध राहणाऱ्या अशा ममताताई आमोदकर यांना पंचायत समितीवर निवडून देऊन सेवा करण्याची संधी मिळावी,” अशी मागणी जोर धरू लागली आहे.







