
जळगाव प्रतिनिधी : हॅलो बातमीदार
जळगांव MIDC परिसरात वसुमित्रा बिअर शॉपीच्या नावाखाली सर्वच ब्रँडच्या दारूची सर्रास विक्री उघडपणे सुरु असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली ही अवैध विक्री आता मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहते, ज्यामुळे परिसरात रात्रीच्या वेळी ‘जत्रेचे स्वरूप’ दिसू लागले आहे.
दारू पिऊन गलका करणारे, रस्त्यावर दिग्गजपणे वावरणारे दारुडे यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे करण्यात आली असली तरी, पोलिस प्रशासनाने ‘सोईस्कर कानाडोळा’ केल्याची चर्चा परिसरात जोरात आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “बिअर शॉपीच्या परवान्याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात वाईन व देशी-विदेशी दारूची विक्री केली जाते. त्यामुळे जळगांव MIDC परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.”
नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ अवैध दारू विक्रीवर बंदी घालण्याची आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, येत्या काही दिवसांत नागरिक आंदोलनाचा इशारा देण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
हॅलो बातमीदार न्यूज नेटवर्क







