Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगरदेवळा जि.प.उर्दू शाळेत अब्दुल कलाम दिन आणि वाचन प्रेरणा दिवस साजरा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 17, 2025
in शैक्षणिक
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा ता.पाचोरा येथे बुधवार, रोजी मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती भारत रतन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण आणि नबी (स.अ.व.) च्या स्तुतीने (नात पाक) झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोराड खेडा उर्दू केंद्रप्रमुख अब्दुल कदीर उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम शेख, उपाध्यक्ष अफरोज शेख, वाजिद शेख आणि अशफाक मजीद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर भाषणे सादर केली. कार्यक्रमाचा उद्देश सांगताना शेख जावेद रहीम यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सेवा, त्याग, भारतीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला शिखरावर नेणे, अग्नी क्षेपणास्त्र, पृथ्वी क्षेपणास्त्र, अणुऊर्जा, संरक्षण शक्ती, अंतराळ संशोधनातील अब्दुल कलाम यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.अशफाक मजीद यांनी दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनीही अब्दुल कलाम यांच्या जीवनाला आदर्श मानून उच्च ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. केंद्रप्रमुख शेख अब्दुल कदीर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अब्दुल कलाम यांच्या यशात पालकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, तसेच शेख अब्दुल कादिर जिलानी (र.अ.), कुतुबुद्दीन बख्तियार काकी (र.अ.), बाबा फरीद-उद्दीन गंज शकर (र.अ.) यांच्या जीवनाची उदाहरणे देऊन पालकांना मुलांच्या प्रशिक्षणाच्या (तरबियत) संदर्भात त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांनी मुलांच्या मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक प्रशिक्षणात पालकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. सध्याच्या काळात मुलींच्या संरक्षणासंबंधी महत्त्वाच्या उपाययोजना सांगितल्या. मुलांच्या शैक्षणिक प्रवासासाठी पालकांना आवाहन केले की, त्यांनी भीती आणि दबावापासून दूर राहून मुलांच्या प्रगतीसाठी मैत्रीपूर्ण, स्वतंत्र आणि आनंदाई वातावरण निर्माण करावे. याच दिवशी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेत मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शक्य ती सर्व मदत करण्याचे आणि जागृत पालक म्हणून भूमिका बजावण्याचे ध्येय घेतले. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेख अन्सार, मोहसिन शेख, मुश्ताक खान, उमर बेग, नासिर मनियार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, खलील शेख, रिजवान शेख, नविदा बानो, सना अन्सारी, सय्यद दिलारा यांनी प्रयत्न केले. शाळेच्या वतीने सर्व मुलांना दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी गृहपाठही देण्यात आला आहे

Previous Post

पाचोरा शहरातील श्रद्धास्थान – कालिकामाता मंदिरात भक्तिमय वातावरणात झाली विधीवत पूजा-अर्चा.

Next Post

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या स्वराने जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेत मिळवले यश,विभागीय स्तरासाठी निवड.

Next Post

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या स्वराने जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेत मिळवले यश,विभागीय स्तरासाठी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..