
प्रतिनिधी – हॅलो बातमीदार भूषण साळुंखे
यावल तालुक्यातील आडगाव कसरखेडा गावात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहे. गावात खुलेआम दारू विक्री, सट्टा, पत्ता, मटका आणि गांजाची अवैध विक्री यांसारखे गुन्हेगारी व्यवसाय निर्भयपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.
या अवैध धंद्यांमुळे गावात भांडणे, चोरी आणि गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले असून, नागरिक भयभीत झाले आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
स्थानिकांनी या प्रकाराबाबत पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र कारवाईचा ठोस परिणाम दिसत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
गावातील नागरिकांचा प्रश्न सरळ आहे
गावकऱ्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे की ताबडतोब अवैध धंद्यांवर धडक कारवाई करून गावात शांततेचे वातावरण प्रस्थापित करावे, अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.







