
यावल तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
भुसावळ :
आज भुसावळ शहरातील राजकीय वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. शहरातील ज्येष्ठ नगरसेवक व माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, सामाजिक कार्यकर्ते फिरोज रहेमान शेख आणि उद्योजक बशीर ठेकेदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे भुसावळ शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तिघांनी मा. शरदचंद्र पवार साहेब व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त करत पक्ष प्रवेश केला. संतोष चौधरी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
प्रवेश समारंभात युवा नेते सचिन संतोष चौधरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष विशाल नारखेडे, शहराध्यक्ष अशरफ खान, माजी नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, रेहान कुरेशी, रामदास सावकारे आणि अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी पूर्ण योगदान देण्याची ग्वाही दिली. संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात संघटनात्मक काम जोमाने सुरू असून, युवा नेते सचिन संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क अभियान, कार्यकर्ता मेळावे आणि जनसंपर्क कार्यक्रम राबवले जात आहेत.
या प्रवेशामुळे भुसावळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चा प्रभाव अधिक दृढ होत असून, पक्ष जनतेच्या अपेक्षांचा प्रतिनिधी म्हणून उभा राहण्याची दिशा स्पष्ट होत आहे.







