Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल पंचायत समितीत शिस्तभंग! अधिकारी-कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयातून पसार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 6, 2025
in शासकीय
0

नागरिकांचा संताप, कारवाईची जोरदार मागणी

उपसंपादक:- मिलिंद जंजाळे
यावल पंचायत समितीतील प्रशासन अधिकारी, सह प्रशासन अधिकारी तसेच अनेक कर्मचारी वेळेच्या आधीच कार्यालयातून पसार होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सरकारी कार्यालयातील ही निष्काळजीपणा आणि गैरहजेरी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, शासनाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांची अक्षरशः गैरसोय केली जात आहे.
दररोज ठरलेल्या कामकाजाच्या वेळेपेक्षा खूप आधी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालय सोडून जातात. त्यामुळे कार्यालयात नागरिक कामानिमित्त आले असता त्यांना “साहेब गेले”, “उद्या या” अशा उत्तरांनी परत पाठवले जाते. काही कर्मचाऱ्यांची तर सवयच झाली असून, यावर कोणीही नियंत्रण ठेवत नसल्याने शिस्तभंगाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
शासनाने स्पष्टपणे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.15 अशी वेळ निश्चित केली असताना, यावल पंचायत समितीत ही वेळ फक्त कागदावरच दिसते. प्रत्यक्षात मात्र अधिकारी व कर्मचारी “हवे तसे” येतात आणि “हवे तसे” निघून जातात — हे प्रशासनाकडे दुर्लक्षित राहणे म्हणजे जनतेचा अपमानच म्हणावा लागेल.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटू शकतो आणि आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या गंभीर शिस्तभंगाच्या पार्श्वभूमीवर दिनांक:-6 ऑक्टोबर रोजी 6:30 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित होते फक्त सहाय्यक गटविकास अधिकारी बा. का. पवार, कनिष्ठ सहाय्यक (जन्म-मृत्यू विभाग) पवन भोई, पेन्शन विभागातील एक कर्मचारी, शिक्षण विभागातील एक कर्मचारी आणि शिपाई मनोज बजाज. बाकी सर्व अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते.

Previous Post

राजोरे येथे क्षयमुक्त गाव माझी जबाबदारी कार्यक्रम संपन्न

Next Post

लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार 15 जणांना आरोग्य खाते मध्ये नियुक्त्या, आरोग्य सेवा मंडळ पुणे उपसंचालक डॉ भगवान पवार यांचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष बबलू सोळंकी यांच्या हस्ते सन्मान,

Next Post

लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार 15 जणांना आरोग्य खाते मध्ये नियुक्त्या, आरोग्य सेवा मंडळ पुणे उपसंचालक डॉ भगवान पवार यांचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष बबलू सोळंकी यांच्या हस्ते सन्मान,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..