Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

गडचिरोलीत होतोय मराठी चित्रपटअस्तित्व स्टुडिओ ची ऐतिहासिक सुरुवात

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 6, 2025
in मनोरंजन
0

स्थानिक कलाकारांना राष्ट्रीय मंचावर संधी उपलब्ध
गडचिरोली: नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने अस्तित्व स्टुडिओ च्या रूपाने ‘गोष्ट सुरू होते’ या मराठी चित्रपटाच्या शानदार शुभारंभाने एक नवा आणि अभिमानास्पद अध्याय जोडला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली आणि पेरमिल्लीच्या निसर्गरम्य, अतिदुर्गम भूमीत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला. जिथे एकेकाळी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमायचा, तिथे आता कॅमेऱ्याचा ‘ऍक्शन’ शब्द घुमणार आहे. गडचिरोलीच्या मातीतील सुप्त कलागुणांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याची ही एक मोठी आणि कौतुकास्पद झेप आहे गडचिरोली तील प्रोडक्शन हाऊस अस्तित्व स्टुडिओ घेत आहे.जिल्ह्यातील दुर्गमतेवर मात करत स्थानिक कलावंतांचे पाऊल आता चित्रपट सृष्टी कडे वळविण्याचे कार्य भूमीतील कलावंतांच्या सर्जनशीलतेने आणि निर्माता-दिग्दर्शकांच्या धैर्याने करण्याचा विळा उचलला आहे.गोष्ट सुरु होते’ हा चित्रपट केवळ मनोरंजन नव्हे, तर जिल्ह्याची ओळख केवळ नक्षलवादापुरती मर्यादित नसून, येथील नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि कला किती समृद्ध आहे, हे संपूर्ण देशाला दाखवणार आहे.विशेष म्हणजे, या चित्रपटामुळे येथील स्थानिक कलाकारांना अभिनयाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून, या जिल्ह्याच्या सुप्त प्रतिभेला राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा हा अस्तित्व स्टुडिओ चा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
मांदियाळीत संपन्न झाला मुहूर्त सोहळा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रमुख अतिथी म्हणून किष्टय्या नारायण गड्डमवार, मेडपल्ली चे सरपंच श्री वेलादी, नीता सोमेश्वर रामटेके, यशोधरा यशवंत ढवळे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. चित्रपटाचे मुख्य निर्माता गजानन भिकाजी गेडाम व दिग्दर्शक राजेश ढवळे यांच्या नेतृत्वात सहनिर्माते चिरंजीवी किष्टय्या गड्डमवार, ज्ञानेश्वर नारायण मुठे कुंतल खोजरे आणि मुख्य कार्यकारी निर्माता समीर रामटेके यांनी चित्रपटाच्या चमूला प्रोत्साहन दिले. तंत्रज्ञानाचे महत्त्वपूर्ण काम डी ओ पी स्मोहीत देशपांडे, ग्याफर, अनिरुद्ध वामन मुळीक आणि वी एफ एक्स विभाग मुख्य आयुष जैन, मेक अप विभाग सरिता हटवार हे सांभाळणार असून चित्रपटाच्या पहिल्या शेड्युल मध्ये अभिनेता श्रीकांत पुरमवार आणि अभिनेत्री आर्या चंकापुरे यांच्यासह विशाल पिम्पलमुडे, बन्सी खोब्रागडे, अजय अंबाडरे, सम्राट वाने, राहुल धनवंते, वरून अमरावते, राहुल गुप्ता, साक्षी मगर, संतोष कापसे,धम्मप्रकाश, अमित दुर्गे, समीक्षा ढवले, रोशनी आणि समस्त ‘गोष्ट सुरू होते’ टीमने या नव्या प्रवासाची सुरुवात केली.अंधारातून प्रकाशाकडे – गडचिरोलीचे कलाविश्वगडचिरोलीत चित्रपट निर्मितीसाठी झालेले हे पहिले पाऊल म्हणजे संघर्षातून साकारलेल्या कलेचा विजय आहे. हा चित्रपट केवळ एक गोष्ट सांगणार नाही, तर तो येथील लोकांच्या जिद्दीची, स्वप्नांची आणि विशेषतः स्थानिक कलागुणांची कहाणी असेल. ‘गोष्ट सुरू होते’ ही केवळ चित्रपटाची नव्हे, तर गडचिरोलीच्या नव्या आणि उज्ज्वल भवितव्याची गोष्ट आहे! जी अस्तित्व स्टुडिओ च्या पुढाकाराणे जगापुढे येणार आहे.

Previous Post

यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी साकळीचे सुनिल नेवे यांची निवड

Next Post

‘आरक्षण’ लागले! भडगाव नगराध्यक्ष पदासाठी सुशीला शांताराम पाटील यांची जोरदार तयारी

Next Post

'आरक्षण' लागले! भडगाव नगराध्यक्ष पदासाठी सुशीला शांताराम पाटील यांची जोरदार तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..