
उपसंपादक:- मिलिंद जंजाळे
यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी साकळी येथील विकासोचे माजी चेअरमन तथा संचालक सुनिल बाबुलाल नेवे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड रावेर–यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेनुसार तसेच शेतकरी संघाचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व सर्व संचालक मंडळाच्या एकमताने करण्यात आली.
निवडीचे पत्र यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे मा. उपभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील, मॅनेजर संजय भोईटे व कर्मचारी सुरेश यावलकर यांच्या हस्ते श्री. नेवे यांच्या घरी जाऊन देण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
या प्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटूभाऊ) पाटील, साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉ. सुनिल पाटील, डॉ. प्रणय वाणी, ग्रा.प. सदस्य परमानंद बडगुजर, वाय.जी. नेवे, निलेश चित्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
साकळी येथील मूळ रहिवासी असलेले सुनिल नेवे हे गावातील प्रतिष्ठित व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आहेत. त्यांनी साकळी नूतन विकासोचे चेअरमनपद भूषवले असून सध्या ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते जळगाव जनता सहकारी बँक यावल शाखेचे तज्ञ संचालक आहेत. ते माजी ग्रामपंचायत सदस्य असून गावातील विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.







