
आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आरोटे साहेब यांच्या उपस्थितीत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय राहुल पवार साहेब पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊराव साकडा पोलीस शोध न्युज पेपरचे संपादक नरेंद्र जमादार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित भडगाव येथील जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र त्यांना आरोटे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील हजारो पत्रकारांचे उपस्थिती होती या या कार्यक्रमाला पाचोरा भडगाव चे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील मार्केट कमिटीचे सभापती गणेश भीमराव पाटील जि प सभापती रावसाहेब मनोहर गिरधर पाटील चाळीसगाव येथील जेष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर साहेब यांच्यासह अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत भडगाव येथील जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांची जळगाव धुळे नाशिक नंदुरबार अहिल्यानगर या खानदेश स्तरीय उत्तर महाराष्ट्राच्या आद्य अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्वच पत्रकार बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे







