जळगाव प्रतिनिधी – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात पोलिस ठाण्यात तक्रार का केली या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान वाद झाला. वादाच्या रागातून परस्परांना शिवीगाळ करत सळईने मारहाण करण्यात आली तसेच कोयत्याने गंभीर हल्ला करण्यात आला. ही घटना १० जून रोजी घडली असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंद झाल्या आहेत.
या प्रकरणात एकूण आठ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पहिल्या तक्रारीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी किरण अर्जुन सोये (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चार जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना मारहाण करत जखमी केले.
दुसऱ्या बाजूने, बेबाबाई अभिमान भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, “आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली?” या कारणावरून चौघांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करत गंभीर दुखापत केली.
या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिस अधिक तपास करत असून दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे