
पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेश संघटक सचिवपदी पुण्याच्या सुजाताताई गुरव यांची नुकतीच निवड झाली आहे. नियुक्तीपत्रानुसार त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहणार आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. शुभांगी कळभोर व राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. शरद गोरे यांनी अभिनंदन करून त्यांच्या कार्यामुळे साहित्य व सामाजिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सुजाता गुरव एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणुन प्रसिद्ध आहेत.
गोरगरीबांसाठीच्या प्रश्नांसाठी त्या अहोरात्र झटत आहेत.समाजप्रेरक,
उत्कृष्ट गायिका, वक्ता, लेखिका,
कवयित्री,चित्रपट-नाट्य, अध्यात्मिक
अशा आदी क्षेत्रांत त्या सक्रिय असुन अनेक समाजसेवी संस्थांशी त्या निगडित आहेत.सध्या त्यांचे विधितज्ञ विषयक अभ्यास सुरू आहे.त्यांचे या निवडीबद्दल चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराजराजे भोसले,राम दहीवाळ,शरद बोबडे, शुभांगी महामुनी,ॲड.अर्चना भैरवकर, विजयकुमार मर्लेचा,आरजे.केदार
आप्पासाहेब भांडवलकर, मंगेश गायकवाड,राजाभाऊ धोत्रे पत्रकार दत्तात्रय भोंगळे, सुनील लोणकर,दिपक आळंदीकर,शेखर बारभाई, गुरुप्रसाद राजगुरु आदी मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.







