Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जामनेरमध्ये तणावाचे वातावरण, तरुणाची अमानुषपणे मारहाण करत जमावाकडून हत्या.!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 12, 2025
in क्राईम
0

(प्रतिनिधी: अमोल खरात)

•दै-हॅलो बातमीदार न्यूज नेटवर्क•

जामनेर: शहरात एका धक्कादायक घटनेत एका २१ वर्षीय तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुलेमान रहीम खान (वय २१, रा.छोटी बेटावद, जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान खान हा आज दुपारी काही कामानिमित्त जामनेर शहरात आला होता. यावेळी शहरातील एका कॅफेमध्ये काही अज्ञात तरुणांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्या गावी, छोटी बेटावद येथे जाऊन पुन्हा मारहाण केली.

सुलेमानच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मारहाणीत सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ जामनेर पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र सूत्रांनुसार, काही तरुणांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाला असून, पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत.

Previous Post

कष्टकरी गटई कामगार यांना स्टॉल लायसन देण्याबाबत पुणे महापालिका करत आहे दिरंगाई,रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त एन. जे. प्रदीप चंद्रन यांना निवेदन,

Next Post

ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे मुंबई दादर येथे विविध प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी आक्रोश रेल रोको आंदोलन,

Next Post

ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे मुंबई दादर येथे विविध प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी आक्रोश रेल रोको आंदोलन,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..