
मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते यांची तक्रार
यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
दि.४ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये दाखल केलेल्या प्रथम अपील सुनावणी साठी यावल गटविकास अधिकारी यांनी दुपारी १२ वाजेची वेळ निश्चित केली असतांना यावल गट विकास अधिकारी सुनावणी साठी वेळेचे बंधन न पाळता अनुउपस्थित राहून लोकशाहीचे उल्लंघन केली असल्याची तक्रार मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल जयकर यांनी केली आहे.
यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कडे आज दि.४ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा भिम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख यांची माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये सुनावणी असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते हे वेळेचे महत्व जाणून वेळेवर सुनावणी साठी पंचायत समिती कार्यालय यावल येथे हजर होते मात्र सुनावणी साठी यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी वेळेचे गांभीर्य न ठेवता अनुउपस्थित असल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल जयकर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे यावल पंचायत समितीच्या बेजाबदार गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांची तक्रार दाखल केली असून दिलेल्या तक्रारीत माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी म्हटले आहे कि दि.४ जुलै रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दाखल केलेल्या प्रथम अपील सुनावणीसाठी यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी दुपारी १२ वाजेच वेळ निश्चित केला असतांना यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी हे अनुउपस्थित त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते यांना अनाठायी प्रतीक्षा करावी लागली असून यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या अर्जाची थट्टा केली असल्याने यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी बेजाबदार पणे वागत असून लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन केले असल्याने यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनावरिष्ठ स्तरावर स्पष्टीकरणास बोलाविण्यात यावे.शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी व व अर्जदार यांची पुन्हा सुनावणी लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल जयकर यांनी केली असून बेजाबदार यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असून पुन्हा एकदा बेजाबदार यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा चेहरा सोमोर आलेला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते यांना सुनावणी चा वेळ निश्चित करून देऊन सुद्धा यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी सुनावणी साठी अनुउपस्थित राहणे म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा गळाचेपण्यासारखा प्रकार यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या बेजाबदार पणाचे चित्र समोर आले आहे.तरी आशा बेजाबदार यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही होणे अपेक्षित असतांना आशा बेजबाबदार अधिकार्यांना शासनसेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी केली जात आहे.







