Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून घडणार पुढचे दिव्या, गुकेश – ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 3, 2025
in क्रीडा
0

जळगाव दि. ०३ प्रतिनिधी – जैन हिल्स येथे संपूर्ण भारतासह विदेशातून ११ वर्षाखालील बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला. ५३८ खेळाडूंसह त्यांच्या पालकांची व्यवस्था उत्तमरित्या जैन इरिगेशनच्या माध्यमातून होत आहे. जळगावात होणाऱ्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून क्विन दिव्या देशमूखसह गुकेश डोम्माराजू सारखे खेळाडू घडतील, तसा खेळ खेळाडूंकडून घडेल आणि देशाचे नाव जगभर बुद्धिबळमध्ये उंचावेल असा विश्वास व्यक्त करत खेळाडूंनी चिकाटी ठेऊन मेहनत केली पाहिजे असा प्रेरणादायी संवाद ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे यांनी सहभागी खेळाडूंशी साधला.

३८ वी बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या उद्घाटनप्रसंगी अभिजीत कुंटे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन उपस्थित होत्या. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे, मुख्य पंच देवाशीष बरूआ उपस्थित होते. दरम्यान दुपारच्या फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी प्रिती अग्रवाल यांच्यासह जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड कंपनीने प्रायोजकत्व स्विकारले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील पाच वर्षाचा वल्लभ अमोल कुलकर्णी तसेच आठ वर्षाखालील आशियाई विजेता अद्वित अग्रवाल, १० वर्षाखालील पश्चिम बंगाल मधील विश्वविजेता मनिष शरबातो, ७ वर्षाखालील जागतीक स्कूल गेम विजेती प्रणिता वकालक्ष्मी यासह युएई, अबुधाबी, जर्मनी, मलेशिया येथील भारतीय वंशाचे १४ खेळाडूंसह ५३८ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

फोटो ओळ.
(DSC04229) जैन हिल्स येथील अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे उद्घाटन करताना सौ.ज्योती अशोक जैन ( डावीकडून) आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे, कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, मुख्य पंच देवाशीष बरूआ व मान्यवर
मुलींच्या गटात, पहिल्या फेरीअखेर राशी वरुडेकर ने तेलंगणाच्या प्रत्युषा मित्रा चा खळबळजनक पराभव केला, तर लावण्या जुनेजा हिने झारखंड च्या दिशिता डे ला बरोबरीत रोखले. तर उत्तराखंड च्या लक्षीताने देखील केरळ च्या जानकी ला बरोबरीत रोखले.

दुसऱ्या फेरीमध्ये मानांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे विजय नोंदवले असून तिसऱ्या फेरी च्या सुरवातीला ३६ खेळाडू २ गुणांसह आघाडीवर होते. महाराष्ट्राच्या प्रिशा घोलप, आश्वी अग्रवाल तर केरळची दिवि बिजेश, तामिळनाडूच्या श्रीनिका , पूजा श्री, त्रिपुरा ची आराध्या दास , दिल्ली ची अन्या गुप्ता, तेलंगणाची संहिता, पश्चिम बंगालची राजन्या मंडळ , आदित्री बैस्य तर आसाम ची मुग्धा कोट,कर्नाटकची रिश्विता महाजन आणि गुजरातची आरीनी सिंग या खेळाडूंची पहिल्या आठ पटावर झुंज चालू होती.

Previous Post

शिंदखेडा तालुक्यातील मौजे साळवे गावातील ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. उषाबाई संतोष वाघ आखिर पुन्हा सरपंच पदावर कायम.

Next Post

माहिती अधिकार प्रथम अपील सुनावणीसाठी निश्चित असतांना यावल गटविकास अधिकारी अनुउपस्थित

Next Post

माहिती अधिकार प्रथम अपील सुनावणीसाठी निश्चित असतांना यावल गटविकास अधिकारी अनुउपस्थित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..