
साकळीचे सरपंच दिपक पाटील यांनी पुस्तके व क्रिडा साहित्यांची व्यवस्था करून दिली
तरुणवर्गासाठी सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा मानस
यावल तालुका प्रतिनिधी :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी येथील लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील यांचेकडे गावातील काही तरूण मुलांनी पोलिस भरतीसाठी लागणारे पुस्तके व क्रीडा साहित्याची मागणी केली होती.तरुण वर्गाच्या भविष्याचा विचार करून तात्काळ निर्णय घेत सरपंच दीपक पाटलांनी या तरुणांसाठी एका दिवसात सर्व क्रिडा साहित्यांची व संबंधित पुस्तकांची व्यवस्था करून दिली.याबद्दल सर्व मुलांनी ग्रामपंचायत कार्यालयात भेटुन दिपक पाटील आभार मानले.गावातील विवीध शासकीय नोकरभरतीसाठी इच्छुक मुलांनी सध्या तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने खोली घेवुन या साहित्यासह अभ्यास सुरू केला आहे.
विविध शासकीय स्पर्धा परीक्षा-भरती तसेच इतर शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या आपल्या गावातील तरूणांना अभ्यासासाठी गावात लवकरच सुसज्ज अभ्यासिका सुरू करणार आहे.आपल्या यासंदर्भात गावाबाहेर नोकरी , व्यवसाय करणारे अनेक नागरिकांसोबत बोलण सुध्दा झालेल आहे.ते सर्वजण अभ्यासिकेसाठी मदत करायला तयार आहे.त्यानुसार ग्रामपंचायत व गावातील नागरिकांच्या मदतीने ही सुसज्ज अशी अभ्यासिका लवकर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. सुसज्ज अभ्यासिका तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. असे सरपंच दीपक पाटील यांनी सांगितले.







