Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राज्यसभा खासदार पद्मश्री अॅड.उज्वल निकम यांचा छत्रपती संभाजी नाट्यगृहात आज भव्य नागरी सत्कार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 26, 2025
in राजकीय
0

जळगाव, दि.२६ प्रतिनिधी – सुप्रसिद्ध विधिज्ञ, विशेष सरकारी वकील, नुकतेच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेल्या खासदार पद्मश्री अॅड. उज्वल निकम यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा उद्या दि. २७ जुलै, रविवारी सायंकाळी ५ वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ परिसर येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला असून, अॅड. उज्वल निकम यांना गौरविण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पद्मश्री अॅड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.

नागरी सन्मान क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे, पाणीपुरवठा मंत्री व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावळ, माजी मंत्री सुरेशदादा जैन तसेच खासदार स्मिता वाघ, जिल्ह्यातील सर्व विधानसभा आमदार यात सुरेश भोळे, किशोर पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, आणि विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे, सत्यजित तांबे, किशोर दराडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे उपस्थितीत असतील.

सकाळ पासून भव्य स्वागत
सकाळी ६.१५ वाजता – अॅड. उज्ज्वल निकम यांचे जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना माल्यार्पण, जी. एम. फाउंडेशन – भाजप कार्यालय येथे सत्कार सोहळा, स्वागत मिरवणूक यात टू व्हीलर, फोर व्हीलर रॅली : स्टेशन ते बॅरिस्टर निकम चौकापर्यंत , त्यानंतर सायंकाळी ५ वाजता – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे भव्य मुख्य नागरी सत्कार सोहळा आहे.

अशी आहे कार्यक्रम आयोजन समिती
पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष अशोक जैन आहेत. त्यांच्यासमवेत सहभागी मान्यवरांमध्ये भरत अमळकर, नंदकुमार बेंडाळे, ललित चौधरी, जितेंद्र लाठी, भालचंद्र पाटील, रोहित निकम, नितीन लढ्ढा, बंडू काळे, सुनील भंगाळे, डी. डी. बच्छाव, नारायण लाठी, ललित कोल्हे, संग्रामसिंह सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, डॉ.राधेश्याम चौधरी, अनिश शहा, प्रकाश बालाणी, विनोद देशमुख, करीम सालार, अॅड.सुशील अत्रे, शंभू पाटील, डॉ. शिरीष बर्वे, नंदू अडवाणी, डॉ. राजेश पाटील, अजित वाघ, हरीश मुंदडा, राजेंद्र नन्नवरे, अरविंद देशमुख, उज्ज्वल चौधरी, एजाज मलिक, संजय पवार, अशोक लाडवंजारी, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, कल्पेश छेडा, अमित भाटीया, अभिषेक पाटील, शरद तायडे, विष्णु भंगाळे, डॉ. केतकी पाटील, सचिन नारळे, रविंद्र लढ्ढा, प्रीतम रायसोनी, अशोक राठी, पंकज जैन, गिरीश सिसोदिया, अॅड.सुरेंद्र काबरा, डॉ. राहुल महाजन, जितेंद्र पाटील, राहुल पवार, जगन्नाथ बाविस्कर, विरेंद्र पाटील, मनोज काळे, गजानन देशमुख, राजेश झाल्टे, प्रशांत नाईक, उज्ज्वला बेंडाळे, रितेश निकम, योगेश कलंत्री, दिलीप तिवारी, प्रीती अग्रवाल, अमर देशमुख, सुरेश पाटील, विकास भदाणे, भीमराव मराठे, बाळासाहेब सूर्यवंशी, हर्षाली चौधरी, संतोष पाटील, राम पवार, विकास बोरोले, राहुल तोडकर, युसुफ मकरा, मनीष चौधरी, श्रीकांत खटोड, रोहन बाहेती, संतोष इंगळे, संगीता पाटील, प्रमोद पाटील, सुरेंद्र पाटील, सरिता माळी-कोल्हे, अतुलसिंह हाडा, श्याम कोगटा, श्याम तायडे, ललिता पाटील, सुनील मोर, अनिल अडकमोल, मनोज सोनवणे, विराज कावडीया, किरण तळेले, श्रीराम पाटील, राजेश डी.पाटील, उदय भालेराव, अॅड. आनंद मुजुमदार, अॅड. जमिल देशपांडे, डॉ. जितेंद्र कोल्हे, आदर्श कोठारी, मनोज पाटील, नरेश रेदासणी, गनी मेनन, प्रेम केसवाणी, संजय एम. पाटील, सुनिल खडके, केतन राणे, संजय व्यास, राजेश हसवाणी, अॅड प्रवीणचंद्र जंगले, राहुल नेतलेकर

Previous Post

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने जामनेर शहरात तीव्र आंदोलन

Next Post

जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

Next Post

जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..