Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 8, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
शेवगाव तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ दादा काळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शेवगाव शहरातील काही ठिकाणी परवानगी नसताना देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. यामुळे परिसरातील तरुणांवर वाईट परिणाम होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः शिवाजीनगर भागात ही विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काळे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायावर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात येत्या २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या निवेदनाची प्रत राज्य उत्पादन शुल्क मंत्री, जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांनाही देण्यात आली असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

Previous Post

जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थिनींचा उन्हात पायी प्रवास एसटी.प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उशीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

April 8, 2026

जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थिनींचा उन्हात पायी प्रवास एसटी.प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उशीर

April 8, 2026

मिनल करनवाल यांची बदली; जळगाव जिल्हा परिषदेला करिश्मा नायर यांचे नवे नेतृत्व

April 7, 2026

साकळी परिसरात हत्तीरोग निर्मूलनाकडे मोठी झेपशिरसाड येथे TAS-3 नंतर PVS सर्वेक्षण यशस्वी

April 7, 2026

प्रशासनाला पाझर फुटेना, की कुणाचे पाठबळ? उपोषणकर्त्या प्राजक्ता तायडे यांची प्रकृती खालावली; पोलिसांचा मात्र ‘कानाडोळा’!

April 7, 2026

भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन ; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप

April 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..