Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 24, 2026
in क्राईम
0

यावल प्रतिनिधी:- राहुल जयकर

यावल पूर्व वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या प्रकारांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व यांना निवेदन देत अवैध वृक्षतोड तात्काळ थांबवावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकारांना चालना मिळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय, यावल पूर्व समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगीही मागण्यात आली आहे.
वेळेत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे परिसरातील वातावरण तापले आहे. प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

March 22, 2026

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

March 21, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..