Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळीतील आंबेडकर नगर अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य!गटारी तुटलेल्या, सांडपाण्याचे डबके; ग्रामपंचायतीच्या विकास दाव्यांवर नागरिकांचा संताप

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 15, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक : मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी गावातील आंबेडकर नगर अंगणवाडी परिसरात सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरलेले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. परिसरातील अनेक ठिकाणी गटारी तुटलेल्या, सांडपाणी रस्त्यावर वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, आंबेडकर नगर भागात गटारींची दुरवस्था इतकी वाढली आहे की अनेक ठिकाणी गटारी कोसळल्या असून त्यांचे अक्षरशः “तीन तेरा” झालेले आहेत. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा परिसर अंगणवाडीचा असल्याने लहान मुलांना दररोज या घाणीमधून जावे लागत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब ठरत आहे.
दरम्यान, साकळी ग्रामपंचायत मुख्यमंत्री योजनांमध्ये सहभागी असल्याचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात विकासकामे फक्त कागदावरच होत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गावात विकासाच्या नावाखाली कामे सुरू असल्याचे दाखवले जात असले, तरी आंबेडकर नगरसारख्या दलित वस्तीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अशा भागांमध्ये मूलभूत सुविधा उभारणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गटारीच मोडकळीस आलेल्या दिसत आहेत. जर ही योजना प्रामाणिकपणे राबवली गेली असती तर आंबेडकर नगरमधील नागरिकांना अशा अस्वच्छ परिस्थितीत राहावे लागले नसते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ गटारी दुरुस्ती, स्वच्छता मोहीम आणि सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देखील दिला जात आहे.
एकीकडे शासन स्वच्छता आणि विकासाचे मोठे दावे करत असताना साकळीतील आंबेडकर नगर परिसरातील ही भीषण वास्तव परिस्थिती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता तरी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

Previous Post

कोरोना योद्ध्यांची पुन्हा नोकरीसाठी धडपड!जळगावात स्मार्ट कंपनीवर वशिल्याबाजीचा आरोप; पालकमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळीतील आंबेडकर नगर अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य!गटारी तुटलेल्या, सांडपाण्याचे डबके; ग्रामपंचायतीच्या विकास दाव्यांवर नागरिकांचा संताप

March 15, 2026

कोरोना योद्ध्यांची पुन्हा नोकरीसाठी धडपड!जळगावात स्मार्ट कंपनीवर वशिल्याबाजीचा आरोप; पालकमंत्र्यांना निवेदन

March 15, 2026

साकळी ग्रामपंचायतीत पुन्हा वादाची ठिणगी!राजस्व अभियान शिबिराच्या बॅनरमधून महिला उपसरपंच व आदिवासी महिला सदस्यांचा फोटो गायब; सन्मान की राजकीय दिखावा?

March 14, 2026

नावरे फाट्यावरील ‘जिवघेणा’ गतिरोधक! अपघातांची मालिका सुरू; प्रशासन मात्र गाढ झोपेत?

March 13, 2026

संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांगांना दरमहा ₹2500; कागदपत्रे 20 मार्चपूर्वी जमा करण्याचे आवाहन

March 13, 2026

यावल ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन वर्षभरापासून बंद; रुग्णांचे हाल, लोकप्रतिनिधी झोपेत?

March 13, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..