
जळगाव, दि. 21 जुलै 2025 – नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अंतर्गत कार्यरत आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने आज दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे फोरमने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की, सरकारद्वारे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक हे पूर्णतः संविधानविरोधी असून, देशातील लोकशाही मूल्यांचा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारे आहे. अशा प्रकारचे कायदे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून, ते स्वीकारार्ह नाहीत, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
या निवेदनप्रसंगी उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांमध्ये –
प्रकाश सरदार (केंद्र सचिव) ,दिनेश इखारे (जिल्हाध्यक्ष),सुमित सोनवणे (जिल्हा महासचिव),प्राजक्ता तायडे (महानगर अध्यक्षा),सतीश कांबळे,मयुरेश निभोरे
यांचा समावेश होता.
यावेळी उपस्थितांनी विधेयकाच्या संभाव्य धोके, त्याचे नागरिकांच्या जीवनावर होणारे परिणाम, आणि यामुळे निर्माण होणाऱ्या लोकशाही विरोधी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. निवेदनाद्वारे प्रशासनाकडे विधेयकाच्या रद्दबाबत शासन दरबारी ठोस पावले उचलण्याची मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली. फोरमची भूमिका स्पष्ट फोरमने यावेळी सांगितले की, संविधानातील मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे प्रत्येक शासनव्यवस्थेचे कर्तव्य आहे. मात्र सदर विधेयक हे सरकारला अनियंत्रित शक्ती प्रदान करते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अधिकार बाधित होतात.
सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकृत करत पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविण्यात येईल याची नोंद घेतली असल्याची माहिती फोरमच्या प्रतिनिधींनी दिली.







