लांडोर बंगला धुळे येथे दरवर्षी सालाबादा प्रमाणे लाखो भिमसैनिक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन अभिवादन करण्यासाठी जात असतात त्या निमित्ताने दोंडाईचा येथील रेस्ट हाऊस येथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब रामभाऊ माणिक यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करण्यात आली होती धुळे नंदुरबार जळगाव उत्तर महाराष्ट्र विभागाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे धुळे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे.प्रभाकर जाधव लक्ष्मण जाधव अरविंद कुवर राजुबाबा शिरसाट आबा खंडारे प्रमे अहिरे महिला जिल्हा अध्यक्ष नयनताई. दामोदर जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, यांनी विचार व्यक्त केले संजय बैसाणे यांनी सूत्रसंचालन केले शिंदखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे.यांनी आभार व्यक्त केले त्याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील दोन कार्यकर्त यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात प्रवेश केला. बंशीला मोरे, व कीशोर सुतारे यांनी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला व समस्त आंबेडकरी समाज रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.