Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 19, 2025
in क्रीडा
0

१३ सुवर्ण तर ४ रौप्य पदकासह प्रथम

जळगाव, दि. १९ प्रतिनिधी – सीआयएससीई बोर्डच्या एच झोनलच्या तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलने वर्चस्व गाजविले. यात १३ सुवर्ण तर ४ रौप्य पदकासह अनुभूती स्कूल प्रथम ठरली.

अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडलेल्या १४, १७ व १९ वर्षा आतील मुलं-मुलींच्या या स्पर्धेचे उद्घाटन मॅट पूजनाने झाले. याप्रसंगी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जळगाव जिल्हा तायक्वोडो असोसिएशनचे सदस्य रविंद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे, प्रशिक्षक जयेश बाविस्कर, सौ. स्मिता बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थित विजयी खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील स्पर्धा या सेंन्सर सिस्टीम्स वर घेण्यात आल्यात.
अशोका युनिव्हर्सल स्कूल नाशिक, केब्रिंज स्कूल, आर. जे. इंटरनॅशनल स्कूल, बारनेस स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, अनुभूती स्कूल जळगाव, रयान इंटरनॅशनल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल या स्कूलमधील सात संघाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

१४ वर्षाखालील मुलांच्या गटातील ३२ किलो खालील वयोगटात धनराज विभूते केब्रिंज स्कूल, ४१ किलो वजनगटात देवेश आर. जे. इंटरनॅशनल स्कूलला सुवर्ण, ४१ किलो वरील वजन गटात स्वर्णीम सराफ ला सुवर्ण, श्लोक टाक ला रौप्य पदक प्राप्त झाले.

मुलींच्या गटामध्ये १४ वर्षाखालील २९ किलो वजनगटात आरल कासारा बारनेस स्कूल सुवर्णपदक, ३२ किलो वजन गटात साधना देशमुख अनुभूती स्कूल सुवर्णपदक, प्रेरणा माटे केब्रिंज स्कूल रौप्य पदक,३८ किलो वजन गटात शरवरी हंडोरे अशोका स्कूल सुवर्ण पदक, भूमी धर्मशाली अनुभूती स्कूल रौप्य पदक, ३८ किलो वजन गटावरील गटात प्रत्युशा राठोड क्रेबिंज स्कूल सुवर्णपदक, अनुभूती चौधरी अनुभूती स्कूल रौप्य पदक, देशना भन्सल केब्रींज स्कूल कास्यपदक प्राप्त केले.

१७ वर्षा खालील वयोगटात साची पाटील, समिक्षा पवारअनुभूती स्कूल सुवर्ण पदक, अक्षरा गडाख अशोका स्कूल रौप्य पदक, लावण्या बेडसे पोदार स्कूल सुवर्ण, किंजल धर्मशाली अनुभूती रौप्य पदक, ४९ किलो वजन गटाखालील गटात भाविका पाटील अनुभूती स्कूल सुवर्ण, ५२ किलो वजन गटाखालील विर्ती बेदमुथा रयान स्कूल सुवर्ण पदक, भव्या अग्रवाल अनुभूती स्कूल रौप्य पदक, ५५ किलो खालील वजन गटात दिया देशपांडे अनुभूती स्कूल सुवर्ण, ५९ किलो खालील वजन गटात जान्हवी जैस्वाल अनुभूती स्कूल सुवर्ण, ६३ किलो खालील वजन गटात शाहिनी जैन अनुभूती स्कूल सुवर्ण, ६८ किलो खालील वजन गटात आदिती कुकरेजा अनुभूती स्कूल सुवर्ण, ६१ किलो वरती वजनगटात हिमांशी राठोड केंब्रीज स्कूल सुवर्ण,

१९ वर्षाखालील वयोगटात ४२ किलो खालील वजनगटात मुक्ती ओसवाल अनुभूती स्कूल सुवर्ण, ४९ किलो खालील वजनगटात समृद्धी कुकरेजा अनुभूती स्कूल सुवर्ण, ६३ किलो वजन गटाखालील पलक सुराणा अनुभूती स्कूल सुवर्णपदक, ६८ किलो वजनगटात अलफेया शाकिर अनुभूती स्कूल सुवर्ण पदक, ६८ किलो वरील गटात स्पर्श मोहिते अनुभूती स्कूल सुवर्ण पदक प्राप्त केले.
मुख्य पंच म्हणून स्मिता बाविस्कर, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन यांनी काम पाहिले. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूल, जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पलक सुराणा हिने सूत्रसंचालन केले.

Previous Post

मुख्यालयी राहणे बंधनकारक असतांना यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा जळगाव ते यावल अपडाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

July 19, 2025

मुख्यालयी राहणे बंधनकारक असतांना यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा जळगाव ते यावल अपडाऊन

July 19, 2025

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

July 18, 2025

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी,

July 18, 2025

बिडगाव येथे कै. ओ. गो. पाटील शाळेत मार्गदर्शनाचा प्रभावी सत्र एपीआय प्रमोद वाघ यांनी केले विद्यार्थिनीना मार्गदर्शन

July 18, 2025

फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्यावरील दांडगाई प्रकरणावरून महसूल संघटनांचा निषेध, काळीफीत लावून कार्यबद्ध आंदोलन सुरू

July 17, 2025
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..