Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 6, 2026
in क्राईम
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
पाचोरा पोटच्या चिमुकल्या मुलीला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन एका २३ वर्षीय विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पाचोरा येथे उघडकीस आली असून या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, २३ वर्षीय पीडित महिला हिला संशयित आरोपी बाळू काळू राठोड (रा. कु-हाड तांडा, ता. पाचोरा) याने गाठले. आरोपीने पीडितेच्या मुलीला तिच्यापासून हिरावून घेतले आणि “तुझ्या मुलीचे काहीतरी बरे-वाईट करेन” अशी धमकी दिली. या धाकाखाली त्याने दि.१९/११/२०२५ रोजी दुपारी एक वाजता पीडितेला पाचोरा येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेला पुन्हा धमकावले की, “जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझी बदनामी करेन आणि तुझ्या मुलीला संपवून टाकेन.या भीतीपोटी पीडितेला त्याने दि.२०/०१/२०२६ रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील मिरजगाव येथील ‘श्रीमंत हॉटेल’वर नेले आणि तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.अखेर या त्रासाला कंटाळून विवाहित पीडितेने पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी बाळू काळू राठोड (रा.कुऱ्हाड तांडा तालुका पाचोरा)याच्याविरुद्ध गुरुन ४४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ६४,६४ (२), (m),११५ (२), ३५१ (२),(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करत आहेत.

Previous Post

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

Next Post

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

Next Post

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

March 26, 2026

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..