Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साने गुरुजी विद्यालयाचे जुने गेट सुरू करण्याची नगरसेवक विजय चौधरी यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 5, 2026
in शैक्षणिक
0

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर

यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शाळेच्या मागील बाजूस नव्याने तयार करण्यात आलेले गेट विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः मुलींसाठी असुरक्षित ठरत असल्याचा आरोप पालक व नागरिकांनी केला आहे.
सदर शाळा यावल नगर परिषदेच्या अंतर्गत येत असून पूर्वी अस्तित्वात असलेले समोरील बाजूचे मुख्य गेट बंद ठेवून मागील बाजूस नवीन गेट सुरू करण्यात आले आहे. मात्र हे गेट विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ये-जा साठी गैरसोयीचे असून त्या परिसरात गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी तीव्र चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शाळेचे जुने समोरील गेट तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा पालक व नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी प्रभाग क्रमांक १० अ चे नगरसेवक श्री. योगेश विजय चौधरी यांच्यासह चेतन अढळकर, रोशन येवले, अतुल चौधरी, मुकेश कोळी, व्यंकटेश बारी, नितीन बारी, रितेश बारी, उज्वल कानडे आदी नागरिक उपस्थित होते.

प्रशासन या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Previous Post

पाचोऱ्यात वाळूमाफियांवर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ रेल्वे पुलावर डंपर पकडले

Next Post

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

Next Post

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

February 6, 2026

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

February 6, 2026

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

February 6, 2026

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

February 5, 2026

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

February 5, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..