Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

5 फेब्रुवारी रोजी जळगांव येथे समता सैनिक दलची जिल्हास्तरीय बैठक.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 2, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
महामानव, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संघटना पुनच्छ उभारण्याचे कार्य समता सैनिक दल ने हाती घेतले असून या संघटना बाबासाहेबांनी स्थापन केल्या आहेत म्हणून त्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहेच, परंतु या संघटनांचे ध्येय आणि तत्वज्ञान देखील महान असून भारतातील सर्व सामान्य लोकांसाठीच नव्हे तर एकूणच मानवी जीवनात सकारात्मक आणि विधायक बदल घडवून आणण्यासाठी आजही अतिशय आवश्यक आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले समता सैनिक दल ही संघटना सर्व भारतीयांसाठी खुली आहे, जात- धर्म – लिंग – वंश यावरून कोणताही भेदभाव या संघटनेत केला जाणार नाही.जातीभेद, धर्मभेद, अनिष्ट प्रथा, परंपरा, समजुती यामुळे निर्माण झालेली सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक अशी दूरवर पसरलेली सर्वांगीण विषमता नष्ट करून स्वातंत्र,समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित असलेली जीवन पद्धती आणि शासन व्यवस्था निर्माण करण्याचे महान कार्य समता सैनिक दलाच्या माध्यमातून करायचे आहे, हेच समता सैनिक दलाचे म्हणजेच आंबेडकरी संघटनांचे कार्य आहे, हेच समता सैनिक दलाचे ध्येय आहे.
या निमित्ताने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगांव येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, तर बैठकीचे मुख्य मार्गदर्शक मा. धर्मभुषण बागुल सर राज्याध्यक्ष (समता सैनिक दल) हे करणार आहेत, तर या बैठकीस संपूर्ण जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी आणि ज्यांची संघटनेत येण्याची तयारी असेल ज्यांची जबाबदारी घेण्याची तयारी असेल अश्या सर्वांनी येण्याचे, उपस्थित राहण्याचे आवाहन समता सैनिक दल (शाखा जळगांव) वतीने करण्यात आले आहे, कार्यक्रमाचे नियोजन विजय निकम राज्य संघटक व किशोर डोंगरे जळगांव जिल्हाध्यक्ष यांच्या नियोजनात होणार असून सदर बैठकीचे आयोजन पद्मालय विश्रामगृह जळगांव येथे करण्यात आली आहे.तर या बैठकीस सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी…..

Next Post

ज्योती विद्या मंदिर सांगवी बु!! येथे एनसीसी कॅडेट्सचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

ज्योती विद्या मंदिर सांगवी बु!! येथे एनसीसी कॅडेट्सचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

March 22, 2026

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

March 21, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..