Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाथर्डीत माळी बाभुळगाव शिवारातील वेश्या व्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 27, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
पाथर्डी अहिल्यानगर रोडलगत माळी बाभुळगाव शिवारातील अ‍ॅपेक्स लॉजिंग येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पाथर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत कुंटनखाना चालवणार्‍या ज्ञानदेव बाळासाहेब रोकडे या संशयित आरोपीस अटक केली आहे. आरोपीस पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत अ‍ॅपेक्स लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार 23 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस पथकाने छापा टाकला.

छापा कारवाईपूर्वी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. लॉजिंगमधील काऊंटरवर बसलेला इसम ग्राहकांकडून पैसे स्वीकारून महिलेला रूममध्ये पाठवत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित इसमास ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीत बनावट ग्राहकास दिलेल्या ठराविक क्रमांकाच्या नोटा तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आला. लॉजिंगमधील रूममध्ये एक पीडित महिला आढळून आली. चौकशीत आरोपीने महिलेस वेश्याव्यवसायासाठी आणून लॉजिंगमध्ये ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. पीडित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत महिला सुधारगृहात पाठवले आहे.या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समवेत पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, कानिफनाथ गोफणे, शाम बनकर, महेश रुईकर, चंद्रावती शिंदे या पोलीस पथकांनी कारवाई केली. आरोपीस पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

यापूर्वीही या ठिकाणावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. पुन्हा या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालू झाला. अनेक नागरिकांच्या तक्रारी असून वेश्याव्यवसाय चालू असलेल्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील परिसरातील उद्योग धंद्यावरही परिणाम जाणवत होता. येथील सुरू असलेला वेश्याव्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांची आहे

Previous Post

सावद्याच्या संतोष तायडे यांची पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग भरारी ‘ए-लाईफ फिटनेस’चा मुंबईत डंका

Next Post

ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; बारामतीमध्ये झाला भीषण अपघात

Next Post

ब्रेकिंग न्यूज: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; बारामतीमध्ये झाला भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

March 22, 2026

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

March 21, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..