Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मृत व्यक्तीच्या नावावर जमीन विक्री!बनावट कागदपत्रांचा महाघोटाळा उघड 12 जणांवर गुन्हा दाखल

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 21, 2026
in क्राईम
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील बोरावल खुर्द शिवारातील शेतजमिनीच्या व्यवहारात मृत व्यक्तीच्या नावावर थेट खरेदी-विक्री करून लाखोंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तब्बल 12 जणांविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यात रु. 11 लाख 15 हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी गु.र.नं. 12/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 319, 351(3), 336(3), 337, 339, 340 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद श्रीमती कांचन संजय खंडी (वय 52, रा. जालना) यांनी दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी 1995 साली मृत्यू झालेल्या मूळ जमीनमालकाच्या नावावर बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर शासकीय कागदपत्रे तयार करून शेतजमिनीचे खोटे व्यवहार दाखवले. संगनमताने वेगवेगळ्या तारखांना बनावट दस्तऐवज तयार करून नोंदणी कार्यालयात नोंदी करण्यात आल्या व त्यातून आर्थिक लाभ उकळण्यात आला.
या फसव्या व्यवहारामुळे फिर्यादीची रु. 11,15,000/- इतकी मोठी आर्थिक हानी झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात यावल, पालघर, ठाणे, मुंबई, विरार व जालना येथील आरोपींचा समावेश असून, यावल पोलीस अधिक तपास करीत आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहारांचे वाढते प्रकार चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आरोपींची नावे (एकूण 12)
अजित तुळशीदास भंडारी (वय 44)शाम मनोहर मुंडडा
सचिन हेमंत राजपूत
रमेश चंद्रकांत कदम (वय 41),
सकलाई दशरथ धनगर (वय 56),शाताराम दशरथ धनगर (वय 39),रविंद्र दशरथ धनगर (वय 34),ईश्वर यशवंत पाटील (वय 62),दिलीप लक्ष्मण धनगर (वय 44),प्रशांत वसंतराव पाटील (वय 45),किशोर सुरेश माळी (वय 33),शेख युसुफ (वय 59)असे आहेत.

Previous Post

रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची बैठक संपन्न; शेगावच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी

Next Post

डॉ.सुजय विखे नगर–मनमाड महामार्गावर; वाहतूक कोंडीचा घेतला आढावा, विरोधकांना धरलं धारेवर..

Next Post

डॉ.सुजय विखे नगर–मनमाड महामार्गावर; वाहतूक कोंडीचा घेतला आढावा, विरोधकांना धरलं धारेवर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..