Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाचोरा येथील नगरपरिषदेच्या कारभाराला गती.विषय समित्या व स्थायी समिती गठीत नव्या सभापतींची निवड.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 19, 2026
in राजकीय
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
नगरपरिषदेच्या प्रशासकीय व विकासात्मक कारभाराला अधिक प्रभावी दिशा देण्यासाठी आज सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी नगरपरिषदेची विशेष सभा पार पडली. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडील विशेष सभेच्या सूचनेनुसार स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांचे सदस्य नामनिर्देशन व सभापती निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली या विशेष सभेत सार्वजनिक बांधकाम, शिक्षण-क्रीडा-संस्कृती, स्वच्छता-वैद्यक-सार्वजनिक आरोग्य पाणी पुरवठा-जलनिस्सारण, नियोजन-विकास तसेच महिला व बालकल्याण अशा महत्त्वाच्या सहा विषय समित्यांची रचना करण्यात आली. प्रत्येक समितीसाठी अनुभवी व लोकप्रतिनिधित्व असलेले सदस्य निवडण्यात आल्यानेनगरपरिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी प्रियंका वाल्मिक पाटील, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी प्रविण हरिश्चंद्र ब्राम्हणे, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सतीष पुंडलिक चेडे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी रहेमान बिस्मिल्ला तडवी, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी किशोर गुणवंत बारवकर तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मिनाक्षी संजय एरंडे यांची निवड करण्यात आली.
तसेच नगरपरिषदेच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या स्थायी समितीवर लोकनियुक्त नगराध्यक्षा, सर्व विषय समित्यांचे सभापती व पालिका सदस्यांनी नामनिर्देशित केलेले श्री. गणेश भीमराव पाटील, श्री. संजय नाथालाल गोहिल व श्री. राहुल अंकुश गायकवाड यांची निवड करण्यात आली.या विशेष सभेचे कामकाज पिठासीन अधिकारी भुषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा विभाग यांनी पाहिले. सभेला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनीता किशोर पाटील, उपाध्यक्ष किशोर गुणवंत बारवकर, सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी मंगेश देवरे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या समित्यांच्या स्थापनेमुळे शहराच्या विकासकामांना चालना मिळून नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत अधिक गतिमान व नियोजनबद्ध निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

प्रभाग 13 व 15 मधील महायुतीच्या विजयी नगरसेवकांचा भव्य सत्कार

Next Post

रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची बैठक संपन्न; शेगावच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी

Next Post

रावेर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची बैठक संपन्न; शेगावच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..