
अहिल्यानगर (प्रशांत बाफना)- महायुतीच्या प्रभाग क्रमांक 13 मधून विजयी झालेले नगरसेवक सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटीया, अविनाश घुले तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील दत्तात्रय गाडळकर यांचा उद्योजक राजेंद्र एकाडे व नंदू एकाडे यांच्या वतीने ऐकाडे मित्र परिवारातर्फे जंगी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी महेंद्र पडोळे, विपुल शेटीया, राजाभाऊ एकाडे, संदीप पडोळे, नितीन एकाडे, नितीन पुंड सर, शंकर पटेल, नरसी भाई पटेल, मगन पटेल, वैभव जगताप, सीमा एकाडे, सुवर्णा एकडे, ऋतिका पडूळे, राजू कानडे, रमाकांत पाडळे, अमृत पटेल, गणेश पालवे, संदीप फुलसौंदर, वैभव बोरुडे, अतुल जाधव, प्रवीण जाधव, राजू जग्गी, रमाकांत कोरडे, दिनेश एकाडे, गणेश बुरा, सचिन दळवी, बनकर सर, प्रीतम बोगावत, सुमित फुलडहाळे, मनीष फुलडहाळे, प्रदीप कुसळकर, पंचम पडोळे, राजू जाधव, तुका वाहवळ, सतीश पठारे, बंटी ठोकळ, ओंकार एकाडे, सनी एकाडे, आर्यन एकाडे, प्रवीण जाधव, अल्ताफ पठाण, साजिद शेख यांच्यासह ऐकाडे मित्र परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी नगरसेवकांचा शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेवकांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करून आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकासाची गंगा प्रभागात वाहणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
या सत्कार समारंभाचे स्वागत राजेंद्र एकाडे व नंदू एकाडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन पुंड सर यांनी मानले.







