
पुणे : /प्रशांत बाफना राज्यातील महानगरपालिका निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचा महापालिका निवडणुकीपासून बोलण्याची शैली, लाडकी बहिण योजनेचा प्रचार यासह इतर राजकीय घडामोडीवरींल भाकित ज्यांच्या सल्ल्याने अजित पवार मांडत होते. तेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश आरोरा. गुलाबी रंगाचं जॅकेट असो किंवा त्यांच्या पक्षाचे गुलाबी बॅनर असोत हे याच नरेश आरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स ’ या पीआर एजन्सीकडून डिझाईन करण्यात आले होते.
अजित पवार यांच्या राजकीय सल्लागार नरेश आरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीवर पुणे येथे गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकउे पैसे वाटपाची तक्रार आली होती त्यानुसार पोलिसांनी तक्रारीतील दाव्यानूसार तपास केला असता काहीही अढळून आले नाही. दरम्यान पोलिसांनी डिझाईन बॉक्स या कंपनीच्या विरोधात एक तक्रार प्राप्त झाली होती. ही तक्रार लेखी नसून फक्त तोंडी होती असे सांगण्यात आले.
पुणे पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेत संबंधित कंपनीच्या कार्यालयावर जाऊन या तक्रारीची खातरजमा केली. या ठिकाणी पोलिसांना काहीही प्रतिकुल आढळून आलं नाही. त्यामुळे कुठलीही करण्यात आली नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते आणि प्रकव्तक सुरज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे वाटपाची तक्रार आल्यावर चौकशीचा अधिकार खरंच क्राईम ब्रांचकडे जातो का? हे पाहावं लागेल.
अशापद्धतीची मुस्कटदाबी करत असेल तर जनता उद्याच्या निवडणुकीत याचं उत्तर देईल अशापद्धतीचं सत्तेत किंवा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला कोणी रोखत असेल तर ते योग्य आहे का? अशा कुठल्याही कारवाईने राष्ट्रवादीला कोणी रोखू शकत नाही. राष्ट्रवादी हा पक्ष जनतेच्या अशिवार्दावर चालणारा पक्ष आहे. कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही पुढेच जाताना दिसू असं सुरज चव्हाण म्हणाले.







