
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यक्ष वैकुंठवासी ह.भ.प.गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) यांच्या आशीर्वादाने तसेच समस्त साकळी ग्रामस्थांच्या तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, साकळी यांच्या सहकार्याने साकळी येथे अखंड हरिनाम संकीर्तन व श्रीमद् भागवत कथा पारायण सप्ताहास आज दि. ९ जानेवारी २०२६ रोजी पासून श्री भवानी माता मंदिर मंगल कार्यालय,साकळी या ठिकाणी सुरुवात होत आहे.यंदाचे सप्ताहाचे २१ वे वर्ष असून हा सप्ताह अतिशय भक्तिमय व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.श्रीमद् भागवत कथा वाचक ह.भ.प.श्री प्रकाश महाराज धुपेश्वर(मलकापूर ) यांच्या अमोघ अशा भक्तिमय वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे वाचन होणार आहे.दररोज सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काकड आरती,दुपारी १ ते ४ पर्यंत भागवत कथा वाचन व रात्री ८ वाजता कीर्तन याप्रमाणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे.या सप्ताह दरम्यान दि.९ रोजी ह.भ.प.जितेंद्र महाराज (म्हसावदकर), दि.१० रोजी ह.भ.प.दिपक महाराज (बोरआजंटी-चोपडा),दि.११ रोजी ह.भ.प.संजय महाराज (मोहराळा),दि.१२ रोजी ह.भ.प.मनोज महाराज ( दुसखेडा),दि.१३ रोजी ह.भ.प.संजय महाराज (फत्तेपूर), दि.१४ रोजी ह.भ.प.श्रीराम महाराज (जळगाव),दि.१५ रोजी ह.भ.प.अंकुश महाराज(मनवेल) यानुसार रोजची किर्तन सेवा होणार असून सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दि.१६ रोजी सकाळी ८ वाजता ह.भ.प. अंकुश महाराज (मनवेलकर) यांची काल्याच्या किर्तनसेवा होणार आहे.दि.१५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दोन ते पाच वाजे दरम्यान दिंडी सोहळा संपन्न होणार आहे तर दि.१६ जानेवारी २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या सप्ताह दरम्यान साकळी परिसरातील गावांमधील भजनी मंडळाचे सहकार्य मिळणार आहे.तरी या सप्ताहातील सर्व भक्तिमय व धार्मिक कार्यक्रमाचा सर्व
भावीक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.







