
सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबीर दत्तक गाव गारखेडा ता. रावेर जि.जळगाव येथे सुरू होते. “शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमिन विकासावर विशेष भर” थीमवर हे शिबिर आधारलेले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अजित दादा पाटील सचिव सातपुडा विकास मंडळ पाल म्हणाले. प्रमुख अतिथी जनता शिक्षण मंडळ खिरोदा येथील सहसचिव श्री सुधाकर झोपे यांनी प्रत्येकाने श्रमदान केलेच पाहिजे असे मनोगतात म्हणाले,सदर कार्यक्रमास रतनदादा बारेला सरपंच ग्रुप ग्रामपंचायत गारखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.पी.लभाणे, श्री रोशन तडवी मुख्याध्यापक जि..प.शाळा गारखेडा.हे उपस्थित होते. शिबिरात दत्तक गावात ग्राम स्वच्छता,जल व्यवस्थापन ,वृक्ष लागवड, अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती,आदी उपक्रम राबविले. कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष एच जहुरे यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन न्याजमीन तडवी तर आभार प्रदर्शन भूषण इंगळे यांनी केले. यावेळी प्रा.चारुलता चौधरी, प्रा विद्या जंगले,प्रा.ऊर्मिला बारेला, राजु नाथबाबा , सय्यद तडवी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.







