
शिरूर तालुक्यातून शंभर महिला व पंन्नास पुरूषांनी क्रांतीची माती लावली कपाळी !
भव्य सावित्रीयात्रेत शिरूरचे फलक ठरले लक्ष वेधी !
अहिल्यानगर /प्रशांत बाफना: महिला शिक्षणासाठी अंगावर शेण आणि शिव्याचा भडीमार घेणा-या फुले दामपत्यांची जयंती मोठ्या उत्साहात गांवोगांवी साजरी होत आहे . सरस्वतीची साक्षात अनुभुती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांची जयंती आपण त्यांचे जन्मगावी जाऊन साजरी करू असा संकल्प करून सावित्रीची लेक तथा स्वच्छता दूत म्हणून ओळखली जाणारी सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ गवळी यांची कन्या योगिता गवळी ने एक वेगळी क्रांती करून शंभर महिला व पंन्नास पुरूष घेऊन सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगांव या क्रांती स्थळाची पवित्र माती आपल्या कपाळी लावली ,हजारोच्या उपस्थितीत होणा-या जन्मोत्सवात शिरूर चे फलक लक्षवेधी ठरले ,संपुर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ज्योतीप्रेमीकडून शिरूरच्या सावित्रिच्या हातफलकाने जयंती उत्सवाला वेगळे प्रेम समर्पित केले .
महिला प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजन !
जयंतीचे औचित्य साधून भव्य स्मारक व महीला प्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजन ग्रामविकास मंत्री जयकुमार यांनी आयोजीत करून मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,मंत्री शंभुराज देसाई ,मंत्री मकरंद पाटील ,संत सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर ,सावता परिषदेचे कल्याण आखाडे ,समता परिषदेचे सुभाष राऊत ,सामाजिक कार्यकर्ते शिरूरचे आदिनाथ गवळी ,सरपंच स्वातीताई जमदाडे आदिसह सातारा जिल्ह्याचे अधिकारी ,पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वत्र फलकाची चर्चा !
मिरवणूक प्रारंभ स्थळापासुन भुमिपुजन व कार्यक्रामाचे व्यासपिठा पर्यंत शिरूरकासार तालुक्यातील सावित्रीलेकीच्या हाती असलेल्या सचित्र फलकांने लक्षवेधून चर्चेचा विषय बनला होता







