
जळगाव:
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले असून, संपूर्ण शहराचे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक १० कडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. येथे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) यांच्यात थेट आणि अतितटीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
राजकीय समीकरणे आणि थेट लढत
प्रभाग क्रमांक १० हा संमिश्र लोकवस्तीचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील भाग मानला जातो. मागील काही वर्षांचा इतिहास पाहता, येथे दोन्ही पक्षांचे पारडे कमी-अधिक प्रमाणात जड राहिले आहे. यंदा मात्र काँग्रेसने आपली गमावलेली जमीन परत मिळवण्यासाठी कंबर कसली आहे, तर भाजपाने आपला गड अभेद्य राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे इतर अपक्ष किंवा लहान पक्ष रिंगणात असले तरी, खरी लढत ही ‘हात’ आणि ‘कमळ’ यांच्यातच रंगणार आहे. प्रभाग क्रमांक १० अ मध्ये अनुसूचित जाती ची राखीव जागा असून यात भाजप तर्फे सुरेश सोनवणे तर राष्ट्रीय काँग्रेस तर्फे सतिश गायकवाड हे रिंगणात आहेत समाजात युथ आयकॉन म्हणून सतिश गायकवाड यांची ओळख असल्याचे सांगितले जात असून भाजप उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर काही आरोपही होत आहे.
आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सत्ताधारी महायुतीचे (भाजप आणि शिंदे गट) अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असून, जळगावात मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. या मुळे या प्रभागातील निवडणुकीला अधिक महत्त्वाची मानली जात आहे याचा निकाल येत्या १६ जानेवारी रोजी बघावयास मिळणार आहे.







