Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

चुंचाळे फाट्याजवळ चाकूच्या धाक दाखवून २४ लाखांची धाडसी लूटनोकराकडीलरोकड हिसकावलीदुचाकीवरून दोन तरुण पसार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 31, 2025
in क्राईम
0

उपसंपादक मन्सूर तडवी : भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्यांना दिलेले उसनवारीचे तब्बल २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी यावल-चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ घडली. सी.डी.-१०० दुचाकीवर आलेल्या २० ते २२ वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी ही धाडसी लूट केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
भुसावळ येथील प्रभात कॉलनीत राहणारे किरण प्रभाकर पाटील (वय ५३) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत ही माहिती दिली आहे. किरण पाटील हे भुसावळ येथील व्यापारी राजेश पारीख यांच्याकडे खासगी नोकरी करतात. पारीख यांनी चोपडा येथील व्यापाऱ्यांकडे दिलेली उसनवारी परत आणण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवली होती.
त्यानुसार किरण पाटील हे आपल्या सी.डी.-१०० दुचाकीने (एमएच १९, डीडब्ल्यू ०५४७) चोपडा येथे गेले. चोपडा येथील महालक्ष्मी स्टील येथून ९ लाख ५० हजार, चामुंडा स्टील येथून ११ लाख आणि महाराष्ट्र स्टील येथून साडेतीन लाख रुपये असे एकूण २४ लाख रुपये त्यांनी एका बॅगमध्ये ठेवले. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ते यावलच्या दिशेने निघाले.
दरम्यान, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चुंचाळे ते साकळी दरम्यान चुंचाळे फाट्यापुढे सुमारे १०० मीटर अंतरावर समोरून एक सी.डी.-१०० दुचाकी विरुद्ध दिशेने आली. अपघात टाळण्यासाठी पाटील यांनी दुचाकी थांबवली असता, दुसऱ्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांच्या पाठीवर अडकवलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
पाटील यांनी प्रतिकार केल्यावर त्यातील एकाने खिशातून चाकू काढून ‘जान से मार दूंगा, बॅग दे’ अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांनी पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. याचवेळी पाटील यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दुचाकीची चावीही काढून घेऊन दोघे यावलच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाले.
थोड्याच वेळात मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने पाटील यांची दुचाकी सुरू करून दिली. त्यानंतर पाटील यांनी तात्काळ मालक राजेश पारीख यांना घटनेची माहिती दिली. पारीख हे यावल येथे आल्यानंतर दोघांनी यावल पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. चोरटे ज्या दिशेने पसार झाले, त्या दिशेने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र उशिरापर्यंत चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. या प्रकरणी यावल पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

कुणी तिकीट देते का? सत्तेच्या हव्यासातून हरवलेला लोकशाहीचा आत्मा*

Next Post

ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुरक्षा रक्षक नेमणूक व सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी

Next Post

ज्योती विद्यामंदिर महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुरक्षा रक्षक नेमणूक व सीसीटीव्ही बसविण्याची जोरदार मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकळी ग्रामपंचायतीच्या खर्चावर संशयाचे सावट!डसबिन वाटपाच्या नावाखाली नेमका कुठून झाला खर्च? माजी सदस्य सैय्यद तैय्यब सैय्यद ताहेर यांचा जाब

January 15, 2026

जळगाव मनपा रणसंग्राम: राजकीय दबावाला न जुमानता ‘स्वराज्य शक्ती सेने’चे १० निष्ठावंत शिलेदार मैदानात

January 14, 2026

ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा

January 14, 2026

साकळीत घाणीचे साम्राज्य!गावातील गटारी तुंबल्या, दुर्गंधीने नागरिक त्रस्तग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आरोग्य धोक्यात

January 14, 2026

मतदानापूर्वीच अजित पवारांना दणका, राजकीय सल्लगाराच्या कार्यालयावर छापा

January 14, 2026

साकळीतील अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहारात आळी!प्रशासनाचा ढिसाळ कारभार ठेकेदार, सेविका व मदतनीसांवर कठोर कारवाईची मागणीअन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

January 14, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..