Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्याची मागणीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर..

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
July 11, 2025
in जळगाव
0

जळगाव – शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मनसेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन याबाबतचे सविस्तर निवेदन सादर केले.

पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली हे प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ, पक्षी व वन्यजीव अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक होते. त्यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून पर्यावरणप्रेमींच्या अनेक पिढ्यांना जागृत आणि प्रेरित केले. ‘अरण्यऋषी’ ही उपाधी प्राप्त असलेले चितमपल्ली यांनी निसर्गसंवर्धनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते.

वर्ष २००९ मध्ये जळगाव येथे पार पडलेल्या ‘वसुंधरा महोत्सवा’त त्यांनी उपस्थित राहून जळगावकरांना आपल्या विचारांनी समृद्ध केले होते. त्यामुळे त्यांचे जळगाव शहराशी असलेले भावनिक नाते अधोरेखित होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या मागणीमागे पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण करणे, नव्या पिढीला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे आणि मा. चितमपल्ली यांच्या कार्याचा गौरव करणे, असे उद्दिष्ट आहे. लांडोरखोरीसारख्या नैसर्गिक परिसरात त्यांच्या नावाचे स्मारक स्वरूपात नाव देणे, हीच खरी मानवंदना ठरेल, असे मनसेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

जिल्हाधिकारी महोदयांनी या मागणीवर सकारात्मक विचार करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे,, राजेंद्र निकम, ललित शर्मा,प्रकाश जोशी, प्रसिद्धी प्रमुख सतीश सैदाने, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, सचिव जितेंद्र पाटील, दीपक राठोड, संजय मोती, विकास पाथरे उपस्थित होते.

Previous Post

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा; आज फायनल

Next Post

स्वर्गीय, वसंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे मान्यवरांना प्रधान,स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांनी समाजामध्ये केलेले योगदान प्रेरणादायी-माजी आमदार उल्हासदादा पवार

Next Post

स्वर्गीय, वसंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे मान्यवरांना प्रधान,स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांनी समाजामध्ये केलेले योगदान प्रेरणादायी-माजी आमदार उल्हासदादा पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

July 19, 2025

मुख्यालयी राहणे बंधनकारक असतांना यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचा जळगाव ते यावल अपडाऊन

July 19, 2025

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई बोर्डच्या ‘एच’ झोनल तायक्वोडो स्पर्धा

July 18, 2025

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी,

July 18, 2025

बिडगाव येथे कै. ओ. गो. पाटील शाळेत मार्गदर्शनाचा प्रभावी सत्र एपीआय प्रमोद वाघ यांनी केले विद्यार्थिनीना मार्गदर्शन

July 18, 2025

फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्यावरील दांडगाई प्रकरणावरून महसूल संघटनांचा निषेध, काळीफीत लावून कार्यबद्ध आंदोलन सुरू

July 17, 2025
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..