
प्रशांत बाफना ! अहिल्यानगर
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे भगवान महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान )आष्टी जि. बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गंगाई-बाबाजी कला रौप्य महोत्सव 2025-26 अंतर्गत देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गंगाई-बाबाजी आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी पत्रकार अशोक शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ‘ आदर्श मराठी लाईव्ह चे संपादक अशोक शिंदे यांना यंदाचा मानाचा ‘गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या दीड दशकांच्या प्रदीर्घ आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेऊन हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.अशोक शिंदे यांनी सन 2011 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केले. आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.सध्या ते गेल्या तीन वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडिया शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.ग्रामीण भागातील प्रश्न पोटतिडकीने मांडणारा एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.हा पुरस्कार लवकरच होणाऱ्या गंगाई-बाबाजी कला रौप्य महोत्सव सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे







