
जळगाव : विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यात विविध कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने शेठ ला.ना. सा. विद्यालयात दरवर्षी डिसेंबर महिन्यात किशोर महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षीही या महोत्सवांतर्गत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात निबंध, सुंदर हस्ताक्षर, कथाकथन, वक्तृत्व, हस्तकला, रांगोळी, हस्तलिखित, अवकाश, पृथ्वी व पर्यावरण तसेच इंग्रजी व्याकरण या विषयांवरील मॉडेल व तक्ता प्रदर्शन, फलकलेखन, आनंद बाजार, विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.
बुधवार, दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, शनिवार, दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता किशोर महोत्सव बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहून सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी, असे आवाहन माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शेठ ला.ना. सा. विद्यालय, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.







