
अहिल्यानगर / प्रशांत बाफना
येथील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपासमोरील रस्ता दुभाजकावर एसटी बस आढळून झालेल्या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.
मिरजगावात शिरतानाच सुरू होणार्या जिओ पेट्रोल पंपा समोरील रस्ता दुभाजकावर नगर -कर्जत ही एसटी बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास समोरील गाडीची प्रखर लाईट डोळ्यावर पडल्याने समोरील रस्ता दुभाजक न दिसल्याने त्यावर जोरदार बस आदळून अपघात झाला. रस्ता दुभाजक तुटून बसचे पुढील दोन चाक निखळून पडले. या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये ज्यादा प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत मिरजगाव पोलिसात चालकाने अपघाताची माहिती दिली.
रिफ्लेटर व स्पीड ब्रेकर बसवा
मिरजगावात सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाल्याने त्यावर मोठे दुभाजक टाकण्यात आले आहे परंतु या ठिकाणी रिफ्लेटर नसल्यामुळे दुभाजकच दिसत नाही. तसेच रस्त्यावर बसस्थानक व शाळा परिसर या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने सतत अपघात होत असतात. तरी या ठिकाणी रिफ्लेटर व स्पीड ब्रेकर बसावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण चुंबळकर यांनी केलेली आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे







