Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 19, 2025
in क्राईम
0

रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील युवकाचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हितेश सुनील पाटील (वय २१) हा युवक जळगाव येथे डिप्लोमा शिक्षण घेत होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तो घरातून कुणालाही न सांगता बेपत्ता झाला होता.

रविवारी (दि.14) हितेशची दुचाकी भुसावळ येथील तापी नदी पुलावर आढळून आली होती. यासंदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आज (दि.17) सकाळी सुमारे ११ वाजता स्थानिक मच्छीमारांना तापी नदीत तरंगताना युवकाचा मृतदेह आढळून आला. ही बाब समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “जोपर्यंत या घटनेमागील सूत्रधार कोण आहे आणि कुणी हत्या केली आहे याचा सखोल तपास होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली.

या मागणीसाठी नातेवाईक व मित्रपरिवाराने निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेह सुमारे एक ते दीड तास ठेवून ठिय्या आंदोलन केले. विवरा गावातील नागरिकही मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती.

दरम्यान, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी येऊन नातेवाईक व जमावाची समजूत काढली. सखोल तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यानंतर शोकाकुल वातावरणात विवरा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीसांकडून सुरू असून हा मृत्यू आत्महत्या की हत्या, याबाबतचा सत्य शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Previous Post

सावधान; आचारसंहितेत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे आता भोवणार

Next Post

यावल–बऱ्हाणपूर रस्त्यावरील वृक्षतोड अभियंत्यांच्या आशीर्वादानेच?परवानगीच्या आदेशावर उडवाउडवी, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न!

Next Post

यावल–बऱ्हाणपूर रस्त्यावरील वृक्षतोड अभियंत्यांच्या आशीर्वादानेच?परवानगीच्या आदेशावर उडवाउडवी, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..